Nilesh Lanke On Uddhav Thackeray
Nilesh Lanke On Uddhav Thackeray Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nilesh Lanke On Uddhav Thackeray : पवारांच्या खासदारांनी ठाकरेंना दिला मोठा शब्द; ठाकरेंनी दिला कामाला लागण्याचा आदेश

Pradeep Pendhare

Nilesh Lanke News : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके यांनी उद्धव ठाकरे यांना 'मातोश्री'वर मोठा शब्द दिला आहे. नगर जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदार संघातून महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार खासदार लंकेंनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर व्यक्त केला. ठाकरे यांनी देखील खासदार लंके यांच्यासह त्यांच्याबरोबर असलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचा आदेश दिला.

खासदार नीलेश लंके यांनी हाच शब्द राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वर्धापनदिन कार्यक्रमात नगरमध्ये शरद पवार यांना दिला होता. आता तोच शब्द उद्धव ठाकरे यांना दिल्याने खासदार लंकेंनी मोठी जबाबदारी स्वीकारल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तसेच खासदार लंके वारंवार करत असलेल्या या विधानावरून नगर जिल्ह्यात महायुती अलर्ट झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके यांनी 'मातोश्री'वर जात उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. तत्पूर्वी मातोश्री बाहेर नीलेश लंके यांच्या विजयाचे आणि शुभेच्छाचे बॅनर लागले होते. मातोश्रीवर जाताच त्यांनी हिंदूहृदयस्रमाट बाळासाहेब ठाकरे यांच्या सिंहासनाचं दर्शन घेतलं. उद्धव ठाकरे यांची भेट घेत आशीर्वाद घेतले. माजी महापौर भगवान फुलसौंदर, विक्रम राठोड, बाळासाहेब बारोटे, शरद झोडगे बरोबर होते.

नीलेश लंके यांनी दिल्लीत लोकसभेत खासदारकीची शपथ घेण्यापूर्वी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे दर्शन, तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे आशीर्वाद घेण्यासाठी मातोश्री आल्याचे सांगितले. माझा राजकीय प्रवास हा शिवसेनेतून झाला आहे. या प्रवासात अनेक अडचणी आल्या. मी अनेकदा भाषणात शिवसेनेचं रुद्र धारण करायला नका लावू, असे म्हणायचो. उपगणप्रमुख, गणप्रमुख, उपगटप्रमुख, गटप्रमुख आणि तालुकाप्रमुख असा माझा शिवसेना संघटनेत प्रवास झाला आहे. या प्रवासात बाळासाहेबांचा आणि अनिलभैय्या राठोड यांचे नेहमीच मार्गदर्शन मिळालं. आता तर उद्धव ठाकरेसाहेबांचे आशीर्वाद नेहमीच बरोबर आहेत, असे नीलेश लंके यांनी सांगितले.

महाविकास आघाडीचा नगरमध्ये मेळावा

महाविकास आघाडीचे सरकार राज्यात आणण्याच्या दृष्टीने उद्धवसाहेबांशी चर्चा झाल्याचे खासदार नीलेश लंके यांनी सांगितले. नगर जिल्ह्यातील बाराच्या बारा आमदार महाविकास आघाडीचे निवडून आणण्याचा निर्धार केल्याचे आम्ही केल्याचे उद्धव ठाकरे यांना सांगितले. उद्धवसाहेबांना माझ्या प्रचारात येता न आल्याची खंत देखील व्यक्त केली. तसेच सर्वसामान्य शिवसैनिक खासदार झाल्याचा आनंद उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. राज्यात विधानसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या प्रचार, सुरवात नगरमधून होणार आहे. यासाठी महाविकास आघाडीच्या मेळाव्याची तयारी लागण्याचा आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. तशी मेळाव्याची तारीख लवकरच सांगितली जाणार असल्याचे नीलेश लंके यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT