Sanjay Raut  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sanjay Raut : मालेगावचा ढेकूण चिरडायला तोफेची गरज नाही; संजय राऊतांचा हल्लाबोल

Uddhav Thackeray : ''चिते की चाल, बाज की नजर, बाजीराव की तलवार और उद्धव ठाकरेकी प्रामाणिकतापर संदेह नहीं करते''

सरकारनामा ब्यूरो

Malegaon News : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात जाहीर सभा सुरू आहे. या सभेत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदे गटाचे नेते दादा भुसे, गुलाबराव पाटील आणि सुहास कांदे यांच्यावर जोरदार टीका केली.

संजय राऊत म्हणाले, ''मालेगावचे शोले भडकले आहेत. त्यामुळे शिवसेना काय आहे हे पाहायचं असेल तर निवडणूक आयोगाने मालेगावमध्ये येवून पाहावं. समोर जे शिवसैनिक बसलेले आहेत ते निष्ठावान आहेत. त्यामुळे ही शिवसेना पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करणार आहे''.

''उद्धव ठाकरे हे मालेगावमध्ये वाजत-गाजत पोहचले. या सभेच्या आधी सर्व माध्यमांमध्ये बातम्या येत होत्या की, उद्धव ठाकरे यांची तोफ मालेगावमध्ये धडाडणार. पण मी सांगतो मालेगावचा ढेकून चिरडायला तोफेची गरज नाही'', असं म्हणत दादा भुसे यांच्यावर नाव न घेता घणाघात केला.

''संजय राऊत या मालेगावच्या सभेच्या माध्यमातून देशाला सांगायचं आहे की शिवसेना तुटलेली नाही. चिते की चाल, बाज की नजर, बाजीराव की तलवार और उद्धव ठाकरेकी प्रामाणिकतापर संदेह नहीं करते'', असं संजय राऊत म्हणाले.

''सध्या शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव नाही. या महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. बेरोजगारांचे प्रश्न आहेत. कांद्याला भाव नाही. कांदा रस्त्यावर फेकला जातो आहे. पण आपल्याला त्या सुहास कांदेला रस्त्यावर फेकायचं आहे. गुलाबराव पाटील यांना रस्त्यावर फेकायचं आहे. ज्यांनी-ज्यांनी गद्दारी केली त्यांना सर्वांना धडा शिकवायचा आहे. सर्व गद्दारांना खोक्याखाली चिरडायचं आहे'', असं म्हणत संजय राऊतांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT