Ambadas Danve News : भुमरे समर्थकांकडून `सामना`ची होळी, दानवे म्हणाले, थोडी तरी लाज वाटू द्या..

Shivsena : ज्यांच्या विचारांना वाचवण्यासाठीचे सोंग करत तुम्ही दगाबाजी केलीत. आज तर तुम्ही बाळासाहेबांवर पण उलटला हो.
Opposition Leader Ambadas Danve-Minister Sandipan Bhumre News
Opposition Leader Ambadas Danve-Minister Sandipan Bhumre NewsSarkarnma

Shivsena : शिंदेची शिवसेना आणि ठाकरे गट सातत्याने एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाही. राज्याचे रोहयो तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांच्याविरोधात नुकतीच `सामना`, मध्ये बातमी प्रसिद्ध झाली. त्याचा निषेध म्हणून भुमरे समर्थकांनी चक्क सामनाची होळी केली.

Opposition Leader Ambadas Danve-Minister Sandipan Bhumre News
Sanjay Shirsat News : चंद्रकांत खैरे थकलेले नेते, त्यांच्यावर टीका करण्यात वेळ घालवू नका..

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) संस्थापक संपादक असलेल्या `सामना`, चीच होळी करण्यात आल्याने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी संदीपान भुमरे यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. (Shivsena) या संदर्भात ट्विट करत अंबादास दानवे यांनी भुमरेंची लाजच काढली.

दानवे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, थोडी तरी लाज वाटू द्या! 'सामना'चे संस्थापक संपादक हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आहेत. हे तेच आहेत, ज्यांच्या विचारांना वाचवण्यासाठीचे सोंग करत तुम्ही दगाबाजी केलीत. आज तर तुम्ही बाळासाहेबांवर पण उलटला हो, संदीपान भुमरे.

अशा शब्दात दानवेंनी भुमरेंना सुनावले. नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात भुमरेंच्या पैठण मतदारसंघातील विकास कामांसाठी निधीच मिळाला नसल्यासंदर्भात सामनामधून बातम्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com