Sandipan Bhumre News : `छत्रपती संभाजीनगर` व्हावे हे बाळासाहेबांचे स्वप्न आम्ही पुर्ण केले...

Marathwada : २० वर्ष खासदार राहिलेल्या खैरेंनी शहराचे वाटोळे केले, आम्ही मात्र कामे करुन दाखवत आहोत.
Sandipan Bhumre-Let.Balasaheb Thackeray News
Sandipan Bhumre-Let.Balasaheb Thackeray NewsSarkarnama
Published on
Updated on

Shivsena : या शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर व्हावे, हे बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पूर्ण केले, असा दावा पालकमंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांनी केला. आमच्यावर गद्दारीचा आरोप केला जातो, जर आम्ही गद्दार, खोके घेणारे असतो तर आम्हाला पक्ष आणि चिन्ह मिळाले असते का? असा सवाल देखील भुमरे यांनी केला. शिवसेना (शिंदे गट) पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते.

Sandipan Bhumre-Let.Balasaheb Thackeray News
Ambadas Danve News : भुमरे समर्थकांकडून `सामना`ची होळी, दानवे म्हणाले, थोडी तरी लाज वाटू द्या..

आम्ही सत्तेत आल्यानंतर शहराच्या नामांतराचा निर्णय घेतला, बाकीच्यांनी केवळ राजकारण केले. २० वर्ष खासदार राहिलेल्या खैरेंनी (Balasaheb Thackeray) शहराचे वाटोळे केले, आम्ही मात्र कामे करुन दाखवत आहोत. (Shivsena) सर्वात जास्त निधी आपल्या जिल्ह्याला मिळवून घेतल्याचा दावा देखील भुमरे यांनी केला.

शहराच्या नामांतरला राजकारणाचे रुप देवू नका. जातीपातीचे राजकारण करुन लोकांच्या भावना भडकवण्याचा कोणीही प्रयत्न करु नये. पहिले मुख्यमंत्री फक्त टिव्हीवर दिसायचे प्रत्यक्ष भेटत नव्हते. मात्र, आत्ताचे मुख्यमंत्री पहाटे तीन वाजता फोन केला तरी भेटतात.

सरकारने शेतकऱ्यांसाठी आत्तापर्यंत १२ हजार कोटींची मदत दिली आहे. सर्वसामान्यांची कामे करण्यासाठी गाव, शहर, तालुका आणि जिल्हा पातळीवर कार्यकारणी जाहीर करा. शिवसेना कोणाची हा लोकांमधील संभ्रम दूर करा, असे आवाहन कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी आपल्या भाषणात केले.

पक्षातील पदाधिकाऱ्यांनी वार्डावार्डातील सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत. टिका करणाऱ्यांकडे जास्त लक्ष देवू नका, असे आवाहन आमदार प्रदीप जैस्वाल यांनी केले. स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणारे मोर्चात सहभागी न होता लपून बसले आहेत. त्यामुळे खैरेंनी आता स्वतःचे नाव चॉंद खैरोद्दीन असे करावे, अशी टिका जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com