Sujay Vikhe  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sujay Vikhe News : आरक्षणासाठी पक्षीय जोडे बाहेर ठेवून एकत्र या !

Maratha Reservation : कोणत्याही लोकप्रतिनिधीने व्यक्त केलेल्या प्रतिक्रयेचा विपर्यास केला जाणे योग्य नाही.

राजेंद्र त्रिमुखे

Maratha Andolan : मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या चांगलाच गंभीर बनला आहे. या मुद्द्यावर बोलल्यास ओबीसी, आदिवासी आदी घटकांमध्ये चलबिचल आहे. वेगवेगळे घटक आपल्या सोयीने अर्थ लावून आगपाखड करतात, कधी या वक्तव्याची ऑडिओ क्लिप व्हायरल होते आणि परिस्थिती नाजूक बनून जात असल्याने नेते मंडळींना बोलावे तर काय आणि कसे बोलावे, असा प्रश्न पडत आहे.

याबाबतची स्पष्ट कबुलीच खासदार सुजय विखे यांनी दिली असून, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर कोणी काही बोलले तरी त्याचा विपर्यास होतो हे अत्यंत दुर्दैवी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सुजय विखे पाटील यांनी राहाता-शिर्डी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषणकर्त्या कार्यकर्त्यांची भेट घेतली. मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा असल्याचे नमूद करून विखे पाटील म्हणाले की,आरक्षणासाठी सुरू असलेले आंदोलन आता नेत्यांची घर जाळण्यापर्यंत येऊन ठेपणे हे योग्य नाही, आरक्षणाच्या प्रश्नावर कोणत्याही लोकप्रतिनिधीने व्यक्त केलेल्या प्रतिक्रयेचा विपर्यास केला जाणे योग्य नसल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

सर्वच लोकप्रतिनिधी मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दिला आहे, परंतु आज जाहीर भाष्य करायला सरपंच पदापासून ते सर्वच पदावर असलेले नेते बोलायला पुढे येत नसल्याकडे लक्ष वेधून या प्रश्नावर प्रतिक्रिया व्यक्त करताना कोणाच्या भावना दुखावणार नाहीत, याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे विखे पाटील म्हणाले.

पक्षीय जोडे बाजूला ठेवा

आरक्षणाचा मुद्दा चिघळल्याची जाणीव राज्य सरकारला पण झाली असल्याने अशा वेळी विरोधी पक्षांना सोबत घेऊन जाणे उचित असल्याने कालच मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावून राज्यातील एकंदरीत परस्थितीचा आढावा मांडला. या बैठकीत राज्यात शांतता प्रस्थापित झाली पाहिजे, या मुद्द्यावर एकमत झाल्याचे दिसून आले.

याच अनुषंगाने सुजय विखे यांनीही आरक्षणाच्या बाबतीत सर्वच पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांवर जबाबदारी ढकलण्यापेक्षा पक्षीय जोडे बाजूला ठेवून आरक्षणाच्या मुद्द्यावर सामूहिकपणे काय करता येईल, याचा विचार करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT