Maratha protesters: मराठा आरक्षणाची धग आता दिल्ली दरबारी; जंतर-मंतर येथील आंदोलन दडपण्याचा पोलिसांचा प्रयत्न

Jantar Mantar News : मराठा आरक्षणाचा निर्णयही दिल्लीतून होऊ शकतो.
Maratha Kranti Morcha
Maratha Kranti MorchaSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : राज्यात मराठा आंदोलन पेटलं आहे. त्याची धग आता दिल्ली दरबारी पोहाेचली आहे. अंतरवाली सराटी येथे सुरू झालेले आंदोलन आता जंतर-मंतर येथे पोहाेचले आहे. गंगाधर पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे.

“मराठा योद्धा मनोज जरांगे पाटीलजी के समर्थन में और मराठा समाज को कुणबी प्रमाणपत्र मिलने हेतू अनशन – सकल मराठा समाज” असे बॅनर आंदोलकांनी जंतर-मंतर येथे लावले आहे.

गंगाधर पाटील म्हणाले, "अनेक मोठे कायदेशीर निर्णय हे दिल्लीतून होत असतात, मराठा आरक्षणाचा निर्णयही दिल्लीतून होऊ शकतो, दिल्लीमध्ये पंतप्रधान, राष्ट्रपती आणि केंद्रीय मंत्रिमंडळ असल्यामुळे दिल्लीत उपोषण सुरू केले आहे."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Maratha Kranti Morcha
Maratha Reservation: सांगलीत सर्वपक्षीय एकवटले; मराठा आरक्षणाच्या लढाईसाठी सत्ताधारी रस्त्यावर

दिल्ली पोलिसांनी जंतर-मंतर येथील आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला, आंदोलकांची झडती दिल्ली पोलिसांनी घेतली. आंदोलकांनी तीव्र विरोध केला. आजपासून (सोमवार) आंदोलकांनी आंदोलन तीव्र केले आहे.

राज्यातील मराठा समाजाला सरसकट कुणबी मराठ्याचे प्रमाणपत्र देण्यात यावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभर सकल मराठा समाजाने साखळी उपोषण सुरू केले आहे. मराठा आरक्षणाचे लोन ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात पसरत असल्याने पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे.

बीडमधून मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर, मराठा आंदोलकांकडून एसटी बस टार्गेट केली जात आहे. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी बीड जिल्ह्यातील एसटी बस वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. एसटी बस वाचवण्यासाठी पोलिसांचा मात्र बीड बस स्थानकाच्या परिसरात बंदोबस्त लावण्यात आला आहे.

दुसरीकडे रात्रीदेखील बीड शहरात रस्त्यावर टायर जाळून मुख्य रस्ता अडवण्यात आला होता. मध्यरात्री आष्टी शहरात तहसीलदार प्रमोद गायकवाड यांची शासकीय गाडी अज्ञात व्यक्तींकडून जाळण्यात आली. यामुळे बीड जिल्ह्यात तणावपूर्ण वातावरण असल्याचे चित्र पाहायला मिळतंय.

Maratha Kranti Morcha
Yavatmal Shasan Aplya Dari : पोलिसाचं टेन्शन वाढलं! मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम उधळण्याचा इशारा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com