Maratha Reservation : सोलापूरचे मराठे दिल्लीला धडकले; घोषणांनी जंतर-मंतर दणाणलं!

Janhit Kunbi Shetkari Sanghatana : आरक्षण मिळत नाही तोपर्यंत दिल्लीच्या या मैदानावरून आम्ही हटणार नाही.
Maratha Reservation
Maratha Reservation Sarkarnama
Published on
Updated on

Delhi News : मराठा आरक्षणाची धग दिल्लीपर्यंत पोहाेचली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी व मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सोलापूरच्या जनहित कुणबी शेतकरी संघटनेने दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर आंदोलन सुरू केले आहे. प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारपासून हे आंदोलन सुरू केले आहे.

देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांनी घोषणाबाजी करीत जंतर-मंतर मैदान दणाणून सोडले आहे. मराठा समाजाची प्रत्येक सरकारने फसवणूक केली आहे. यापुढे मराठा समाज सरकारच्या फसव्या आश्वासनाला बळी पडणार नाही.

मनोज जरांगे पाटील यांच्या जिवाचे बरेवाईट होण्यापूर्वी आरक्षण द्यावे, जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत दिल्लीच्या या मैदानावरून आम्ही हटणार नाही, असा इशारा संघटनेने अध्यक्ष देशमुख यांनी दिली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Maratha Reservation
Maratha protesters: मराठा आरक्षणाची धग आता दिल्ली दरबारी; जंतर-मंतर येथील आंदोलन दडपण्याचा पोलिसांचा प्रयत्न

गंगाधर पाटील यांच्या नेतृत्वाखालीही दोन दिवसांपूर्वी जंतर-मंतर येथे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. “मराठा योद्धा मनोज जरांगे पाटीलजी के समर्थन में और मराठा समाज को कुणबी प्रमाणपत्र मिलने हेतू अनशन – सकल मराठा समाज” असे बॅनर आंदोलकांनी जंतर-मंतर येथे लावले आहे.

Maratha Reservation
Shahaji Patil: माफी मागितल्यानंतरच शहाजी पाटलांची आंदोलकांनी सोडली वाट !

संपूर्ण राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हूणन उपोषण, आंदोलन सुरू झाले आहे. मनोज जरांगे पाटलांना सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे. मावळ मधील आडल बुद्रुक गावातील मराठा समाजाच्या तरुणांनी मुंडन आंदोलन केले. आणि राज्य सरकारला इशारा दिला की आज आम्ही मुंडन आंदोलन केले आहे.

Maratha Reservation
Bhanudas Murkute : विखे, थोरातांच्या कारखान्यांना क्षमता वाढीची परवानगी कशी मिळते? मुरकुटे संतापले

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com