Anil Parab Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Simhastha Kumbh Mela: उध्दव ठाकरेंचे शिलेदार अनिल परब यांचा सरकारवर तिखट हल्ला, कुंभमेळ्याच्या टेंडर मध्ये २४० कोटींचा भ्रष्टाचार?

Mumbai Shiv Sena UBT Anil Parab Simhastha Kumbh Mela tender corruption attack on state government-शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या नेत्याचा राज्या सरकारवर गंभीर आरोप, सरकार भ्रष्टाचार करताना देवाचे पैसेही सोडत नाही!

Sampat Devgire

Anil Parab News: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांवर सातत्याने आरोप होत आहेत. आज विधिमंडळात यावर सरकारला गंभीर आरोपांना सामोरे जावे लागले. कुंभमेळ्याच्या निविदामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा दावा विरोधकांनी केला.

https://www.youtube.com/watch?v=O0U8iA_0YNcसिंहस्थ कुंभमेळ्याच्या प्रश्नावर आज शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी सरकारला घेतले. कुंभमेळ्याच्या कामकाजात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा दावा यावेळी करण्यात आला. सरकारच्या वतीने मात्र हे आरोप फेटाळले. 

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते अनिल परब यांनी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामकाजाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी केली. या कामकाजाविषयी सातत्याने आरोप होत आहेत. या आरोपांना सरकारकडून समाधानकार उत्तरे मिळत नसल्याचा दावाही त्यांनी केला. 

कुंभमेळ्यात विविध रस्त्यांच्या कामाच्या निविदा काढण्यात आल्या. दोन हजार २७० कोटींच्या या कामासाठी १८  निविदा काढण्यात आल्या. त्यासाठी ठराविक कंत्राटदारांना फायदा पोहोचविण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला आहे. 

रस्त्याच्या कामांच्या १८ निविदा काढण्यात आल्या. त्यात एका निवेदत पात्र ठरल्यास संबंधित कंत्राटदार अन्य निवेदन साठीही पात्र ठरतो. त्याला अपात्र ठरविता येत नाही अशी संशयास्पद अट ठेवण्यात आली होती.

मुख्य अभियंता प्रशांत औटी यांनी त्यासाठी पडद्यामागे सूत्रे हलविली. हर कन्स्ट्रक्शन चे विलास बिरारी यांनी यामध्ये घोटाळा केला आहे. १६ कंत्राटदारांनी  कुंभमेळ्याच्या कामांसाठी रिंग केली होती. त्यात २४१ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा दावा शिवसेनेचे परब यांनी केला. 

कुंभमेळ्याच्या रस्त्यांच्या आणि अन्य कामांबाबत शासनाने २०१८ मध्ये अध्यादेश काढला. हा अध्यादेश आणि त्याची प्रक्रिया यावर आमदार परब यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले. त्यात नियोजित कंत्राटदारालाच कामे देण्यासाठी व्यवस्था होती. 

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी विविध कामे होत आहेत. कामांच्या दर्जा विषयी अनेक तक्रारी आहेत. कुंभमेळ्यासाठी होणारा खर्च वादात त्यामुळेच सापडला आहे. सत्ताधारी आणि त्यांचे पुढारी देवाचा पैसाही सोडायला तयार नाही. त्यातही भ्रष्टाचार करीत आहे. हे अतिशय गंभीर असल्याचा दावा परब यांनी केला. 

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT