Uddhav Thackeray Visit : ओम राजेनिंबाळकरांचे राजकारण संपवण्यासाठी उद्धव ठाकरे धाराशिवमध्ये...लोकसभेसाठी विरोधात भावालाच ताकद देणार?

Dharashiv visit News : यवतमाळ-वाशीम, हिंगोली, परभणी, धाराशिव, शिर्डी या मतदारसंघाचा समावेश आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरे 28 जूनला धाराशिवमध्ये येत असून कार्यकर्त्याशी संवाद साधणार आहेत.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Dharashiv news : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत फूट पडल्यानंतर सहा खासदारांनी बंड करीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांनी या सहा खासदारांचे लोकसभा मतदारसंघ पिंजून काढण्याचा निर्धार केला आहे. त्यानुसार तयारी सुरु केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या या चार दिवसीय दौऱ्याची अधिकृत सुरुवात 26 जूनपासून होत आहे. या काळात ते एकूण सहा मतदारसंघांना भेटी देतील. त्यामध्ये यवतमाळ-वाशीम, हिंगोली, परभणी, धाराशिव, शिर्डी या मतदारसंघाचा समावेश आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरे 28 जूनला धाराशिवमध्ये येत असून कार्यकर्त्याशी संवाद साधणार आहेत.

धाराशिव येथे होता असलेल्या या कार्यक्रमाची जोरदार तयारी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून केली जात आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या 28 जूनला होणाऱ्या धाराशिव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पूर्ण ताकदीने मैदानात उतरली आहे. धाराशिव जिल्हा सहसंपर्क प्रमुख मकरंदराजे निंबाळकर यांनी उमरगा व तुळजापूर मतदारसंघात पूर्वतयारी बैठका घेत शिवसैनिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

Uddhav Thackeray
Maharashtra News Live Update : अखेर ऑपरेशन टायगर झालेच! ओमराजे निंबाळकर शिंदेंच्या शिवसेनेत जाणार...

या मेळाव्यात आगामी काळात होत असलेल्या निवडणुकांची रणनीती, पक्ष संघटना अधिक मजबूत करणे आणि जनतेच्या प्रश्नांवर थेट संवाद साधण्यासाठी हा मेळावा महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे धाराशिवच्या राजकीय घडामोडींना आता वेग आला असून, संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या दौऱ्याकडे लागले आहे.

Uddhav Thackeray
Sarkarnama Exclusive : ओम राजेनिंबाळकर आधी मतदारसंघात जाणार... दिवसही ठरला : बंडखोरी करण्यापूर्वीचा सगळा प्लॅनच सांगितला

धाराशिव शहरातील सिद्धाई मंगल कार्यालयात हा संवाद मेळावा पार पडणार आहे. ठाकरे यांच्या शिवसेनेत नुकत्याच झालेल्या बंडानंतर कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह भरणे, पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करणे आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधून पुढील राजकीय दिशा ठरवली जाणार आहे.

Uddhav Thackeray
Shivsena News : केंद्रात शिवसेनेच्या वाट्याला आणखी दोन मंत्रीपदे येणार; फुटलेल्या खासदारांमधील 'ही' नावे चर्चेत

धाराशिव येथे होत असलेल्या या कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी आमदार अंबादास दानवे, आमदार कैलास पाटील आणि संपर्क प्रमुख सुनील काटमोरे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. ठाकरे यांच्या धाराशिव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. बंडखोर खासदारांच्या बालेकिल्ल्यात जाऊन संघटना पुन्हा उभी करणे आणि कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह भरणे हा या उद्धव ठाकरे धाराशिव दौऱ्याचा उद्देश आहे.

Uddhav Thackeray
Om Rajenimblkar : पक्षाने संधी दिली तर ओम राजेनिंबाळकरांविरुद्ध रस्त्यावर उतरणार; धाराशिवमध्ये भाऊबंदकी पुन्हा आमनेसामने

खासदार ओम राजेनिंबाळकर यांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे धाराशिव दौऱ्यावर येत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या या चार दिवसीय दौऱ्याची अधिकृत सुरुवात 26 जूनपासून होत आहे. या काळात ते एकूण सहा मतदारसंघांना भेटी देतील. 27 जूनला यवतमाळ, वाशिम, हिंगोली दौरा करणार आहेत. या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजेच 27 जून रोजी उद्धव ठाकरे विदर्भातील यवतमाळ-वाशिम आणि मराठवाड्यातील हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा दौरा करतील. या ठिकाणी ते स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणार आहेत.

Uddhav Thackeray
Shivsena News : केंद्रात शिवसेनेच्या वाट्याला आणखी दोन मंत्रीपदे येणार; फुटलेल्या खासदारांमधील 'ही' नावे चर्चेत

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com