NCP MLA Diliprao Bankar, DCM Ajit Pawar  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Diliprao Bankar : आमदार दिलीप बनकरांचा मंत्रिपदाचा दावा कमजोर; नगरपालिका निवडणुकीत सुमार कामगिरी भोवणार?

MLA Dilip Bankar’s ministerial claim : माणिकराव कोकाटे यांच्या रिक्त झालेल्या मंत्रिपदावर दिलीप बनकर यांनी फील्डींग लावली. पण आता नगरपालिका निवडणुकीतील त्यांची कामगिरी पाहाता त्यांचा दावा कमजोर झाला आहे.

Ganesh Sonawane

Nashik Politics : बनावट कागदपत्रांच्या आधारे सदनिका लाटल्याच्या प्रकरणात शिक्षा झाल्याने राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. आता त्यांच्या रिक्त जागेवर मंत्रिपदासाठी राष्ट्रवादीचे निफाड तालुक्याचे आमदार दिलीप बनकर हे फील्डींग लावत आहेत. दोन दिवस आमदार दिलीप बनकरांच्या नावाची जोरदार चर्चाही होती.

परंतु आता नगरपालिका निवडणुकीत दिलीप बनकर यांच्या सुमार कामगिरीमुळे त्यांचा मंत्रिपदावरील दावा कमजोर झाल्याचे चित्र आहे. दिलीप बनकर यांच्या मतदारसंघात पिंपळगाव बसवंत व ओझर अशा दोन्ही ठिकाणी नगरपालिका निवडणूक होती. दोन्ही ठिकाणी बनकरांना राष्ट्रवादीची सत्ता आणण्यात अपयश आलं आहे.

मतदारसंघाचे आमदार या नात्याने दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीला यश मिळवून देणे ही दिलीप बनकर यांचीच जबाबदारी होती. पण त्यात ते अयशस्वी झाले आहे. पिंपळगाव बसवंत नगरपरिषदमध्ये आमदार दिलीप बनकर यांना होमग्राउंडवरच अपयश आलं. एकमेकांचे विरोधक असलेल्या दिलीप बनकर व भास्कर बनकर यांच्या अकल्पित युतीला जनतेने नाकारले.

याउलट भाजपचे जिल्हाध्यक्ष यतीन कदम यांनी आपले नेतृत्व सिद्ध करुन दाखवले आहे. जिल्ह्यातील दोन्ही आजी-माजी आमदारांना धूळ चारत ओझरसह शेजारची पिंपळगाव बसवंत नगरपालिका भाजपने त्यांच्या नेतृत्वाखाली जिंकली. त्यामुळे यतीन कदम यांचे राजकीय वजन आता वाढले आहे. निफाडमध्ये यतीन कदम यांनी दोन्ही आजी-माजी आमदारांवर मात करुन भाजपचा विजय संपादित करुन दिला आहे.

खोसकरांमुळे राष्ट्रवादीची अडचण

इगतपुरीचे राष्ट्रवादीचे आमदार हिरामण खोसकर यांनीही इगतपुरी व त्र्यंबकेश्वर या दोन ठिकाणी भाजपला डिवचल्यामुळे राष्ट्रवादी आता अडचणीत आली आहे. भाजप नाशिक महापालिका निवडणुकीत आता युतीसंदर्भात राष्ट्रवादीसोबत चर्चाही करायला तयार नाही. खोसकर यांचा मतदारसंघ असलेल्या इगतपुरी व त्र्यंबकमध्ये दोन्ही ठिकाणी भाजपच्या उमेदवारांचा पराभव झाला आहे. कारण या दोन्ही ठिकाणी खोसकरांनी शिंदे गटाला मदत केली होती असे भाजपचे मत बनले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT