BJP Politics : नाशिकमध्ये भाजपला राष्ट्रवादी नकोच? विनवण्या करुनही गिरीश महाजन युतीबाबत चर्चा करायला तयार नाही

Nashik Municipal Election : एकीकडे मंत्री महाजन यांची शिवसेनेचे मंत्री दादा भुसे यांच्यासोबत युती संदर्भात चर्चा सुरु आहे. असे असताना तेच महाजन राष्ट्रवादीच्या नेत्यांना मात्र वेळही द्यायला तयार नाही.
Girish Mahajan | Ajit Pawar
Girish Mahajan | Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Nashik Politics : राज्यातील महापालिकांच्या निवडणुकांसाठी 15 जानेवारीला मतदान होणार असून, 16 जानेवारीला निकाल जाहीर केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीयांमध्ये घडामोडींना वेग आला आहे. नाशिकमध्येही महायुती व महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये युतीसंदर्भात खलबते सुरु आहेत.

भाजपने नाशिक महापालिका निवडणुकीसाठी फार आधीच शंभर प्लसचा नारा दिला आहे. भाजपकडे सर्वच १२२ जागांसाठी सक्षम उमेदवार आहे. त्यामुळे मित्रपक्षांच्या अपेक्षा पूर्ण करणे शक्य नसल्याने स्वबळावर लढावे अशी अपेक्षा स्थानिक भाजप नेत्यांची आहे. मात्र वरिष्ठ पातळीवर पक्षश्रेष्ठींकडून मात्र युती करुनच लढण्याच्या सूचना आहेत. मात्र भाजपला फक्त शिवसेनेसोबत युती करायची आहे की काय अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे.

एकीकडे भाजप व शिवसेना शिंदे गटात जागा वाटपा बाबत चर्चेचे गुऱ्हाळ सुरु आहे. युती करताना सन्मानपूर्वक जागा मिळायला हव्यात असे शिवसेना शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांना सांगितले आहे. त्यानुसार किमान ५० जागा मिळायला हव्यात अशी मागणी शिवसेनेने भाजपकडे केल्याचे समजते. मात्र भाजपने फार फार तर २३ किंवा २५ जागा देऊ असे कळवल्याची माहिती सूत्रांकडून समजते.

Girish Mahajan | Ajit Pawar
Sinnar Politics : खासदार वाजेंचा गड आला पण सिंहच कसा पडला? कोकाटे-वाजेंच्या कथित सेटिंगच्या चर्चांनी राजकारण तापलं..

एकीकडे महाजन -भुसे यांच्यात युती संदर्भात चर्चा सुरु असताना मात्र यात राष्ट्रवादी कुठेच दिसत नाही. त्यामुळे राष्ट्रवादीला सोडून केवळ भाजप व शिवसेना अशी युती नाशिकमध्ये होते की काय अशी शक्यता निर्माण होऊ लागली आहे. त्याचं कारण म्हणजे भाजपचे संकटमोचक राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसोबत युतीसंदर्भात साधी चर्चाही करायला तयार नाहीत.

सोमवारी युतीच्या चर्चेसाठी मंत्री गिरीश महाजनांकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अक्षरशः विनवणी केल्याचे पाहायला मिळाले. त्याचे झाले असे की, हॉटेल रेडिसन ब्ल्यू येथे गिरीश महाजन यांच्याशी चर्चा करण्यासाठी मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार हिरामण खोसकर, माजी खासदार समीर भुजबळ हे गिरीश महाजन यांच्या भेटीसाठी वेटींगवर होते.

Girish Mahajan | Ajit Pawar
Suhas Kande Politics : मनमाडचा किंग झोपवला, सुहास कांदेंनी केला नव्या 'पाटलाचा' उदय

नंतर मंत्री महाजन कारमधून निघाल्यावर 'पाच मिनिटं तरी वेळ द्या, 'सगळे आले आहेत' अशी विनवणी आमदार हिरामण खोसकर आणि नरहरी झिरवाळ यांनी गिरीश महाजनांना केली. परंतु, राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत युतीची चर्चा न करताच गिरीश महाजन मुंबईकडे रवाना झाले. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत भाजपला युतीच करायची नाही म्हणून महाजनांनी चर्चा न करताच निघून गेल्याची शंका व्यक्त होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com