Municipal elections : Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Municipal elections : महापालिका निवडणुका आता लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतरच?

सरकारनामा ब्यूरो

Nashik NMC News: गेल्या दिड वर्षांपासून प्रलंबित असलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात होतील, अशा चर्चा होत्या. पण विधानसभा आणि लोकसभा निवडणुकाही अवघ्या आठ-नऊ महिन्यांवर आल्या आहेत. सर्वच राजकीय पक्षांनीही या निवडणुकांची तयारी सुरु केल्याने आता महापालिका निवडणुका आणखी लाबंणीवर पडण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

15 मार्च 2022 रोजी नाशिक (Nashik) महापालिकेची (NMC) मुदत संपली. त्यानंतर महिनाभरात जिल्हा परिषद (ZP) व पंचायत समित्यांचीही मुदत संपली.राज्यातील सत्तांतरानंतर या निवडणुका होतील असं वाटलं होते. पण गेल्या दीड वर्ष तरी निवडणूक होत नाही त्यामुळे स्थानिक पातळीवर सरकारमधील प्रमुख पक्षांवर नाराज असल्याचेही दिसून आले आहे. (Municipal elections)

या संदर्भात सध्या मतदारांचा कल लक्षात घेऊन निवडणुकीचा निर्णय घेतला जात नसल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. मागच्या महिन्यात राज्याच्या सत्ता संघर्षाचा निकाल लागला. या निर्णयानंतर तरी राज्यात महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील, असा अंदाज होता, त्यानंतर ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात निवडणुका होतील, असेही सांगितले जात होते. (BJP Politics)

दिवाळीच्या आसपास निवडणुका होतील, असे दावे राज्यात प्रमुख सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपच्या नेत्यांकडूनही करण्यात आले. राज्यात पुन्हा निवडणुकीचे वातावरण तयार होऊ लागले. इच्छुकांनी पुन्हा एकदा मतदारांच्या भेटीगाठी घेण्यास सुरवात केली. आरोग्य शिबिरे, आधार कार्ड शिबिरे, शैक्षणिक सहली मतदारांसाठी विविध प्रकारचे शिबिरे आयोजित करण्यात आली. महापालिका निवडणुकांच्या या वातावरण निर्मितीमुळे आता तरी लवकरच निवडणुका जाहीर होतील असाही अनेकांनी अंदाज बांधला. (Maharashtra Politics)

अशातच राज्यात महापालिका निवडणुकांसह लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचीही तयारी सुरु केली आहे. भाजपने महाराष्ट्रात 48 पैकी 45 तर विधानसभेच्या 200 जागांवर निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. एप्रिल किंवा मे २०२४ या महिन्यात विधानसभा व लोकसभा निवडणुका एकाच वेळी होऊ शकतात, असं काही जाणकारांचं म्हणणं आहे. या निवडणुकांमुळे राज्यातील महापालिका निवडणुका पुन्हा लांबणीवर पडू शकतात, असंही सांगितलं जात आहे. महापालिका निवडणुकांमध्ये राजकारणाचे स्थानिक घटक प्रभाव पाडतात.

दरम्यान, भाजपसाठी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका महत्त्वाच्या आहेत. आताच जर महापालिका किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेतल्या तर त्याचा परिणाम लोकसभा व विधानसभा निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच राज्य सरकारकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा केली जात नसल्याचं सांगितलं जात आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT