Kalwan Farmers protection Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Police News: आदिवासी युवकाच्या खून प्रकरणाला धक्कादायक वळण, आईनेच घरात लपवल्याचा दावा.

Murdered tribal youth found alive, Jamaba had pelted stones at police, farmers angry -पोलिसांवर दगडफेक आणि शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल करणाऱ्यांवर कारवाईची शेतकऱ्यांची मोर्चाद्वारे मागणी.

सरकारनामा ब्युरो

Kalvan Police News: आदिवासी युवक विठोबा पवार यांचा खून झाल्याचा दावा केला जात होता. याबाबत आंदोलन करून पोलिसांवर दगडफेक देखील झाली होती. आता या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले आहे.

दोन दिवसांपूर्वी कळवण खुर्द येथील विठोबा पवार हा आदिवासी शेतमजुर बेपत्ता झाला होता. त्याचा खून झाल्याचा दावा करण्यात आला. याप्रकरणी शेतकऱ्यावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यासाठी जमावाने आंदोलन केले.

यासंदर्भात आदिवासी जमावाने आगळी करून पोलीस ठाण्याला गेराव घालण्याचा प्रयत्न केला होता. मी पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक देखील झाली. त्यामुळे वातावरण तापले होते. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला होता.

जमावाच्या दबावामुळे पोलिसांनी राजेंद्र शिंदे आणि राहुल शिंदे या शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचा तपास सुरू केल्यावर धक्कादायक माहिती पुढे आली. झाल्याचा दावा असलेल्या युवकाला त्याची आई सावित्रीबाई पवार आणि भाऊ सुरेश पवार यांनी घरातच डांबून ठेवले होते.

युवकाला घरात डांबून ठेवून पवार कुटुंबीयांनी आदिवासींचा मोठा जमाव जमवला. पोलीस ठाण्यावर दबाव टाकत गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले. यामध्ये द्राक्ष उत्पादक शेतकरी शिंदे यांना पोलिसांनी अटक केली.

संबंधित युवक जिवंत असल्याचे कळल्यावर गावात एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्यात त्याचा निषेध नोंदवला. संदर्भात पोलिसांनी तातडीने संबंधित युवकाची आई आणि भाऊ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली.

राजेंद्र शिंदे आणि राहुल शिंदे यांच्यावर दाखल केलेला गुन्हा तात्काळ रद्द करावा. शिंदे यांना तात्काळ मुक्त करावे. या प्रकरणातील कटकारस्थानात सहभागी असलेल्या सर्वांना पोलिसांनी अटक करून कारवाई करावी अशी ही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

ज्या युवकाचा खून झाला असा दावा केला जात होता तोच जिवंत आढळला आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता नाट्यमय वळण मिळाले आहे. ज्यासाठी जमाव जमवून पोलीस ठाण्यावर आंदोलन तसेच पोलिसांवर दगडफेक झाली ते प्रकरणच बोगस असल्याचे आढळले आहे. त्यामुळे पोलिसांपुढेही मोठा पेच निर्माण झाला आहे.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT