Sharad Pawar NCP Protest Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sharad Pawar NCP : राष्ट्रवादीची सरकारला चपराक, 'त्या' अजब मोर्चामुळे अधिकाऱ्यांची पळापळ

Sharad Pawar NCP On Maharashtra Budget 2024 : दोन दिवसांपूर्वीच अर्थसंकल्पात दूध उत्पादकांसाठी सरकारने घोषणा केली. मात्र या घोषणाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने अक्षरशः वाभाडे काढले आहेत.

Sampat Devgire

Nashik News, 30 June : दोन दिवसांपूर्वीच अर्थसंकल्पात दूध उत्पादकांसाठी सरकारने घोषणा केली. मात्र या घोषणाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने अक्षरशः वाभाडे काढले आहेत. शरद पवार (Sharad Pawar) गटाने मोर्चा काढत अर्थसंकल्पाला उत्तर दिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड आणि किरण सानप यांनी राज्य शासनाच्या अर्थसंकल्पाला आगळ्यावेगळ्या पद्धतीने उत्तर दिले आहे. त्यांनी जनावरांसह दुग्धविकास कार्यालयावर मोर्चा काढला. त्यांच्या अजब मोर्चा'ने दुग्ध विकास विभाग आणि पोलिस विभागाची अक्षरशः पळापळ झाली.

पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील दूध बाजारातून हा मोर्चा काढला. यावेळी त्यांच्यासमवेत जनावरेही होती. त्याची कुण कुण लागल्याने पोलिसांची (Police) चांगलीच धावपळ उडाली. दुग्धविकास कार्यालयातील अधिकारी देखील अस्वस्थ झाले होते.

पोलिसांनी अशोक स्तंभ परिसरात ही जनावरे ताब्यात घेऊन त्यांना पुढे नेण्यास मज्जाव केला. यावेळी पक्षाचे पदाधिकारी आणि पोलिसांमध्ये चांगलीच झटापट झाली. त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांना निवेदन देण्यात आले.

सध्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळणाऱ्या दर दहा ते बारा रुपये प्रति लिटर कमी आहे. सध्या केवळ 22 ते 27 रुपये दर मिळतो तो प्रत्यक्षात किमान 34 रुपये प्रति लिटर हवा. राज्यात दोन लाख टन दुधाची पावडर शिल्लक आहे. तिला खप नाही. असे असतानाही शासनाने दहा हजार टन दुधाची पावडर आयात केली आहे. हे धोरण शेतकरी विरोधी आहे.

येत्या निवडणुकीत राज्यातील महायुती सरकारला शेतकरी धडा शिकवतील, असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी धम्मपाल खरात, यश जोशी, शिवम शिरसाट, भगवान नागरे, सुदाम ढाकणे, पोपाट नागरे, ऋषिकेश पगार, अजिंक्य चकोर, बाळासाहेब चकोर आदी नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT