Rajabhau Vaje : शासनाचा अर्थसंकल्प हा लोकसभेतील दणक्याचा 'इफेक्ट'

Rajabhau Vaje On Mahayuti Govt Budget 2024 : "अर्थसंकल्पात अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. भरपूर आश्वासने दिली आहेत. मात्र ही आश्वासने पूर्ण करण्यासाठी सरकारची मानसिकता आहे का?"
Ajit Pawar Budget
Ajit Pawar BudgetSarkarnama

Shivsena News : राज्यातील महायुतीच्या सरकारने नुकताच अर्थसंकल्प सादर केला. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अपेक्षित असलेला हा अर्थसंकल्प आहे. त्यावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.

या संदर्भात शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी राज्य सरकारवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे लोकसभेत जनतेने दिलेला दणका आहे आणि या दणक्यामुळेच सरकारला अशा कल्पना सुचल्याचं वाजे यांनी म्हटलं आहे.

खासदार वाजे (Rajabhau Vaje) म्हणाले, "अर्थसंकल्पात अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. भरपूर आश्वासने दिली आहेत. मात्र ही आश्वासने पूर्ण करण्यासाठी सरकारची मानसिकता आहे का? हे तपासले पाहिजे. आजवर महायुतीच्या शासनाने जनतेची जी गैरसोय आणि अडचणी केल्या त्यावरून तरी हे सरकार संवेदनशील नाही, असंच स्पष्ट होते. या अर्थसंकल्पाद्वारे (Budget) सरकारने जनतेला खुश करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र राज्यातील जनता या सरकारला ओळखून आहे. जनता समजदार आहे."

Ajit Pawar Budget
Raj Thackeray : लोकसभेच्या निकालानं सर्वांना जमिनीवर आणलं, राज ठाकरेंच्या वक्तव्यावर अजितदादांचे नेते म्हणाले...

जनतेला खोटी आश्वासने

तसंच राज्य सरकारने अर्थसंकल्पातून सरकारने जनतेला खोटी आश्वासने दिली आहेत. ही आश्वासने प्रत्यक्षात येतील का? हा खरा प्रश्न आहे. अंदाजपत्रकातील घोषणा व त्यातील आश्वासनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणे महत्त्वाचे असते. निवडणुका दोन महिन्यांवर आल्यावर दिलेल्या घोषणांवर किती विश्वास ठेवणार असा प्रश्नही वाजे यांनी उपस्थित केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com