Chhagan Bhujbal with Newly elected MVP Office bearers Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

MVP Election: छगन भुजबळांकडून मविप्र पदाधिकाऱ्यांचा सत्कार

भुजबळ फार्म येथे मविप्र संस्‍थेच्‍या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सत्‍कार केला.

Sampat Devgire

नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज (MVP) संस्थेच्या (Education) नुकत्याच झालेल्या निवडणुकीत अॅड. नितीन ठकरे (Adv. Nitin Thackray) विजयी उमेदवारांनी शुक्रवारी भुजबळ फार्म येथे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. (MVP office bearers meeting with Chhagan Bhujbal is in discussion)

मराठा समाजाची शिक्षण संस्था असलेल्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सदस्यांनी छगन भुजबळ यांची भेट घेतल्याने ही भेट सध्या सभासद तसेच राजकीय नेत्यांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे. याबाबत सभासदांत विविध चर्चा केल्या जात असल्याने हा सत्कार सगळ्यांसाठी चर्चला विषय देऊन गेला आहे.

मराठा विद्याप्रसारक समाज संस्‍थेचे नवनिर्वाचित सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांच्‍यासह पदाधिकाऱ्यांनी माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. या वेळी श्री. भुजबळ यांच्‍या हस्‍ते पदाधिकाऱ्यांचा सत्‍कार झाला. मविप्र निवडणुकीत परिवर्तन पॅनलने ऐतिहासिक विजय मिळवत संस्‍थेचे नेतृत्‍व हाती घेतले आहे. या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांची भुजबळ फार्म येथील कार्यालयात सदिच्छा भेट घेतली.

या वेळी भुजबळांनी पदाधिकाऱ्यांचा सन्मान करत संस्थेच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांच्‍यासह तालुका संचालक नंदकुमार बनकर, डॉ. सयाजीराव गायकवाड यांचाही सत्कार झाला. ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, प्रा. बाळासाहेब पिंगळे, जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पगार, प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे आदी उपस्थित होते.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT