NAFED NCCF Onion Policy  sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Onion farmers : राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलनाचा भाजप नेत्यांना दणका, शेतकऱ्यांना दिलासा; बाजार समितीतूनच नाफेड खरेदी करणार कांदा!

NAFED NCCF Change Onion Policy : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी केलेलं आंदोलन कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारं ठरलं आहे.

Sampat Devgire

BJP Vs NCPSP and Shivsena UBT News : नाफेड आणि एनसीसीएफ या केंद्र शासनाच्या संस्थांनी अखेर आपले धोरण बदलले आहे. त्यामुळे उद्यापासून थेट बाजार समितीतून कांदा खरेदी होईल. त्याचा शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

नाफेड आणि एनसीसीएफ या केंद्राच्या संस्था कांदा खरेदी करतात. बाजार हस्तक्षेप योजनेअंतर्गत होणाऱ्या या खरेदीत शेतकऱ्यांची कोंडी करणाऱ्या अटी होत्या. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर असंतोष पसरला होता.

संदर्भात गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या नेत्यांचं विरोधकांनी मोठे आंदोलन केले. त्याचा परिणाम प्रशासनावर झाला आहे. संदर्भात कांदा खरेदीच्या नियम बदलण्यात आले आहेत.

नाफेड यापूर्वी कांदा खरेदी करताना संस्थांच्या माध्यमातून करीत असे. या संस्था प्रामुख्याने भाजप नेते आणि लोकप्रतिनिधींची संबंधित असल्याचा आरोप होता. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचे आरोप झाले.

विरोधकांनी केलेल्या या आरोपांचा परिणाम म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी नाफेडला धोरण बदलण्याच्या सूचना केल्या आहे. त्यापासून व दर्जा कांदा 60% आणि 40% सामान्य दर्जाचा खंड खरेदी केला जाईल. ही खरेदी थेट बाजार समितीतून होईल. त्यामुळे मध्यस्थ आणि भाजपच्या संस्थांना त्याचा मोठा दणका बसला आहे.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीत शनिवारी बैठक झाली. तत्पूर्वी खासदार भास्कर भगरे यांनी केंद्र शासनाला पत्र लिहून धोरण शिथिल करण्याची मागणी केली होती. प्रहार संघटनेचे नेते गणेश निंबाळकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली होती.

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, मंत्री दादा भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांसह लोकप्रतिनिधींची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात झाली. त्यात शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यावर प्राधान्य देण्यात आले. बाजार समितीतून कांदा खरेदी केला जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. राजकीय हस्तक्षेप कमी होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT