Nashik Onion Politics : नाशिक जिल्ह्यात नाफेड (NAFED) व एनसीसीएफ (NCCF) या संस्थांच्या माध्यमातून मागील काही वर्षांमध्ये जवळपास ५ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचे समोर आले असून याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. या बहुचर्चित कांदा खरेदी घोटाळ्यातही भोंदू अशोक खरात याची एण्ट्री झाली आहे.
सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथील पत्त्यावर नोंदणीकृत केलेल्या श्री. व्यंकटेश फार्मर प्रोड्युसर कंपनीमध्ये अशोक खरात व त्याची पत्नी कल्पना खरात हे संचालक असून त्यांच्या राजकीय वजनाचा वापर करुन या कंपनीला हजारो टन कांदा खरेदीचे कंत्राट मिळाल्याचे उघडकीस आले आहे.
याप्रकरणी श्रीरामपूर येथील स्वतंत्र भारत पक्षाचे निलेश शेडगे यांनी पोलीसात तक्रार केली आहे. श्री व्यंकटेश फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून हे व्यवहार करण्यात आल्याचा आरोप शेडगे यांनी केला आहे.
शेडगे यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले की, २०२१-२२ पासून हा घोटाळा सुरु आहे. खरातने सिन्नर तालुक्यात श्री. व्यंकटेश फार्मर प्रोड्युसर तसेच ईशानेश्वर फार्मर प्रोड्युसर या नावाने कंपन्या स्थापन केल्या. प्रत्यक्ष शेतकऱ्यांकडून MSP च्या भावाने कांदा, मका, सोयाबीन पिकांची खरेदी करावी असा सरकारचा उद्देश आहे. यामागे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा असा सरकारचा उद्देश आहे. मात्र, या खरात बाबाने ज्या फार्मर प्रोड्युसर कंपन्या स्थापन केल्या या कंपन्यांनी शेतकऱ्यांकडून माल न घेता तो थेट व्यापाऱ्यांकडून घेतला व तो NCCF व NAFED विक्री दाखवला.
याप्रकरणात खरातला राजकीय नेते तसेच नाफेड व एनसीसीए च्या काही अधिकाऱ्यांची देखील मदत झाल्याचा आरोप निलेश शेडगे यांनी केला आहे. खरातला याप्रकरणात मदत करणाऱ्या सर्वांची इडी चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच आणखी अशा सुमारे १७ ते १८ कंपन्यांमध्ये खरातचे भांडवल असल्याचं शेगडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
दरम्यान, याप्रकरणात NAFED आणि NCCF च्या काही बड्या अधिकाऱ्यांनी अशोक खरातला मदत केल्याचे प्राथमिक माहितीतून समोर येत आहे. हा केवळ आर्थिक घोटाळा नसून तो शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशावर मारलेला दरोडा असल्याची संतप्त भावना नाशिकच्या शेतकरी वर्गात निर्माण झाली आहे. उच्चस्तरीय SIT पथक नेमून याची सखोल चौकशी करावी आणि दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी पुढे येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.