Kiran Lahamate, Amit Bhangare Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nagar Political News : भांगरेंची लहामटेंवर सडकून टीका ; अकोल्याचे राजकारण तापणार..

राजेंद्र त्रिमुखे

Nagar Political News : आदिवासी बहुल अकोले तालुक्याचे राजकारण हे अनेक दशके पिचड-भांगरे संघर्षातून दिसून आले. शरद पवार आणि अकोल्याचे मधुकर पिचड हे समीकरण अनेकवर्षे दिसून आले यात भांगरे परिवार शरद पवार यांना मानणारा असला तरी स्थानिक परस्थितून विरोधात राहिला. आता बदलत्या राजकीय परस्थितीत 2019 पासुन भांगरे कुटुंब पुन्हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षासोबत आले आहे.

यातूनच आता भाजपात गेलेले पिचड आणि अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदार किरण लहामटे Kiran Lahamate यांच्या विरोधात अमित भांगरे यांनी मोठी आघाडी निर्माण करण्यासाठी कंबर कसल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार Sharad Pawar यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अमित भांगरे यांच्या उपस्थितीत देवठाण मध्ये कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी बोलताना भांगरे यांनी आ. लहामटे यांच्यावर चांगलीच सडकून टीका करत अनेक गंभीर आरोप केले. भांगरे यांच्या या आरोपांमुळे आता अकोल्याचे राजकारण तापणार असून येणारी विधानसभेची ही नांदी असल्याचे बोलले जात आहे. 2019 विधानसभा निवडणुकीची पार्श्वभूमी सांगताना भांगरे यांनी स्वर्गीय अशोक भांगरे यांनी पवार साहेबांना शब्द देत मनापासून काम करत आ. लहामटे यांच्यासाठी काम केले.

आम्हाला वाटले की एक गरीब कुटुंबातील व्यक्ती आमदार केल्यास ती जनतेचे ऐकेल आणि चांगले काम करेल. मात्र निवडून येताच आ. लहामटे यांच्या डोक्यात हवा शिरली. त्यांनी जनतेला लाथडले आम्हालाही ते विसरून गेले. पुढे अजित पवारांसोबत जात भाजपच्या विचारसरणी सोबत ते गेले. एक गरीब कुटुंबातील व्यक्ती आमदार होताच खोके आणि मिळालेल्या निधीमधून टक्केवारीवर गोरगरीब राहिला नाही, असा मोठा आरोप अमित भांगरे यांनी भाषणातून केला.

तालुक्यातील निळवंडे, आढळा, पिंपळगाव आदी धरणांची कामे पवार साहेबांमुळे झाली. ज्यांचे बोट धरून नेते मोठे झाले त्यांनीच साहेबांशी आणि अकोल्याच्या जनतेशी गद्दारी केली अशी खरमरीत टीका भांगरे यांनी आ. लहामटे आणि पिचडांवर केली. जिल्हा रुग्णालयाचे एक काम मंजूर झाले. पण महायुतीतल्या तिन्ही नेत्यांचे स्वतंत्र फ्लेक्स बोर्ड लागले.

भांगरे कुटुंबाने अनेक कामे केली पण कधी श्रेयवाद केला नाही. तालुक्याच्या विकासासाठी स्व. यशवंतराव भांगरे नेहमी पवार साहेबांसोबत राहिले. मधल्या काळात पिचड आमच्या विरोधकांसोबत असल्याने अशोक भांगरेंना वेगळी भूमिका घ्यावी लागली, मात्र साहेबांना एकेक करून सोडून जात असताना भांगरे कुटुंब पवार साहेबांसोबत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पक्षाशी आणि जनतेशी गद्दारी केलेल्याना अकोले तालुक्यातील जनता लक्षात ठेवून आहे असे सांगतानाच 2024 विधानसभेच्या मैदानात भांगरे परिवार ताकतीनिशी उभा राहणार असल्याचे संकेतच अमित भांगरे यांनी दिले आहेत.

(Edited by Amol Sutar)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT