Nilesh Lanke Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nilesh Lanke News: 'हो डिपार्टमेंट... डिपार्टमेंट बाजूला व्हा! नीलेश लंकेंचा इशारा

Nagar South Lok Sabha Constituency 2024: नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महायुती भाजपचे उमेदवार खासदार सुजय विखे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार नीलेश लंके यांच्या प्रचाराच्या तोफा धडाडत आहेत.

Pradeep Pendhare

Nagar News: महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार माजी आमदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांनी शेवगावच्या सभेत पोलिस प्रशासनाला चांगलेच ठणकावले. सगळा हिशोब 13 तारखेनंतर घेणार असल्याचा इशारा नीलेश लंके यांनी देताच सभेतून कार्यकर्त्यांनी ओरडून जोरदार प्रतिसाद दिला. नीलेश लंकेंच्या या इशार्‍याची चर्चा रंगली आहे.

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महायुती भाजपचे उमेदवार खासदार सुजय विखे आणि महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांच्या प्रचाराच्या तोफा धडाडत आहेत. महायुतीकडे सध्या तरी भाजप नेते मंत्री राधाकृष्ण विखे प्रचाराचा गाडा पुढे रेटून नेताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, मंत्री विखेंवर नगर जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघांची जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांना प्रचारातून उसंत नाही.

नगर दक्षिणचे भाजपचे उमेदवार (Nagar South Lok Sabha Constituency 2024) खासदार सुजय विखे यांनीदेखील सभांचा धडाका लावला आहे. विखे पिता-पुत्र प्रचारात अलर्ट मोडवर आहेत. गाठीभेटींवर भर देताना दिसत आहेत. यातच शरद पवार यांनीदेखील या वेळची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे.

नगरमध्ये त्यांच्या सहा सभा होत आहेत. यातील तीन सभा झाल्या आहेत. शेवटच्या टप्प्यात शरद पवार नगरमध्ये तळ ठोकून राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे निवडणुकीत रंग भरला आहे. शरद पवार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांचे बळ मिळाल्याने महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार नीलेश लंके यांनीदेखील आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसते.

प्रत्येक सभेत नीलेश लंके आक्रमक होताना दिसत आहेत. डमी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आल्यापासून नीलेश लंके कमालीचे आक्रमक झाले आहेत. शेवगावमधील सभेत नीलेश लंके यांनी भाषणाच्या सुरुवातीला डिपार्टमेंटला (पोलिस प्रशासन) अंगावर घेतले. त्यामुळे ही सभा चर्चेत आली आहे.

सभेच्या व्यासपीठाजवळ गर्दी झाली होती. कार्यकर्ते पुढे येत होते. त्यामुळे बंदोबस्तावर असलेले पोलिस कार्यकर्त्यांना काही सूचना करत होते. याचवेळी नीलेश लंके भाषणाला उभे राहिले. पोलिस कार्यकर्त्यांना हटकत असल्याचे पाहून नीलेश लंके यांनी त्यांच्या स्टाइलमध्ये डिपार्टमेंटला सुनावले.

नीलेश लंके यांनी, हो डिपार्टमेंट...डिपार्टमेंट..,अशी हाक माइकवरून मारली. "डिपार्टमेंट बाजूला व्हा. आमच्या लोकांना पाहू द्या. आम्ही आमच्या लोकांना संरक्षण देण्यास समर्थ आहोत. निवडणूक लागल्यापासून तुम्ही पोलिस प्रशासनाने किती त्रास दिला, याची आमच्याकडे सगळी नोंद आहे. आम्ही एखाद्या कार्यकर्त्याच्या हॉटेलवर बसलो, तरी दुसर्‍या दिवशी रेड करता. आमच्याबरोबर कार्यकर्ता फिरला, तरी त्याला धमकावण्याचा प्रयत्न केला जातो. नीलेश लंकेंच्या मागे फिरल्यास खोटे-नाटे गुन्हे दाखल करू. हा सगळा हिशोब करू 13 तारखेनंतर घेऊ", अशा इशारा नीलेश लंके यांनी या वेळी भर सभेत दिला.

Edited by: Mangesh Mahale

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT