Nana Patole Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nana Patole News: नाशिकमध्ये भाजपचे लोक हरवले काय?

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपला उमेदवारही मिळाला नाही.

Sampat Devgire

नाशिक : भारतीय जनता पक्षाला (BJP) दुसऱ्याची घरे फोडण्यात (home invasion) आसुरी आनंद मिळतो आहे. मात्र या पक्षाला नाशिक (Nashik) पदवीधर निवडणुकीत उमेदवार देखील देता आलेला नाही, अशी त्यांची अवस्था झाली आहे. नाशिकमध्ये भाजपचे सगळे लोक हरवले की काय, असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे (Congress) अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे. (Patole asks, Is all BJP`s all followers ran away from Nashik)

यावेळी श्री. पटोले यांनी नाशिक पदवीधर निवडणुकीतील वादाबाबत तांबे कुटुंबियांनी दोष दिला. हा त्यांच्या कुटुंबातील वाद आहे. त्याबाबत मला काहीच बोलायचे नाही. जेव्हा हा वाद गंभीर वळण घेईल तेव्हाच त्यावर भाष्य करेन, असे सांगितले.

श्री. पटोले आज नाशिक दौऱ्यावर होते. त्यांच्या उपस्थितीत भवनमध्ये `हाथ से हाथ जोडो` अभियानाचा प्रारंभ झाला. यावेळी विविध पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पत्रकार परिषदेत ते म्हणाले, माध्यमांकडून काँग्रेसला प्रश्न विचारले जात आहेत. वास्तविक याबाबत हे प्रश्न भाजपला विचारले गेले पाहिजेत. जगातील सर्वात मोठा पक्ष असा दावा करणाऱ्या भाजपने नाशिकमध्ये उमेदवार का दिला नाही?. त्यांचे सर्व समर्थक येथून पळून गेले आहेत काय?. कोणी त्यांचा पाठींबा घ्यायला तयार नाही का?. असे अनेक प्रश्न आहेत. त्याची उत्तरे मला भाजपकडून हवी आहेत. मात्र ते त्यावर काहीच बोलत नाहीत.

ते पुढे म्हणाले, भाजप सध्या दुसऱ्यांची घरे फोडण्यात मग्न आहे. तेच राजकारण ते सतत करीत आहेत. मात्र त्यांचा शंभर पापांचा घडा भरला आहे. तो आता केव्हाही फुटेल. मग त्यांचे घर फुटेल तेव्हा त्यांची ही अवस्था होईल. मग त्यांना त्यांच्या दोषाची जाणीव होईल.

महाविकास आघाडीचे सरकार मला अटक करणार होते, असा दावा नुकताच उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केला. त्याबाबत श्री.पटोले म्हणाले, मला वाटले होते, ते काही तरी गंभीर व जनतेच्या प्रश्नावर प्रश्न विचारतील. मात्र त्यांनी नेहेमीप्रमाणे जनतेला गोंधळात टाकण्याचेच काम केले. शेतकरी आत्महत्या, महागाईची झळ, बेरोजगारी, राज्यातून बाहेर जाणारे उद्योग, कायदा व सुव्यवस्थेमुळे त्रस्त झालेली जनता, याचे त्यांना काहीच सोयरे सुतक नाही. ते स्वतःतच मग्न आहेत. काहीतरी असंबद्ध बोलून गोंधळ निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरु आहे.

यावेळी डॉ. तुषार शेवाळे, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, डॉ. काँग्रेस प्रतोद हेमलता पाटील, शरद आहेर, राजाराम पानगव्हाणे, माजी नगरसेवक राहुल दिवे, वसंत ठाकुर आदी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT