Nana Patole Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nana Patole News: नंदुरबारच्या मोदींच्या सभेला गुजरातचे लोक आणले?

Nana Patole At Nandurbar : सभेसाठी नंदुरबारमध्ये अतिशय उत्साहाचे वातावरण आहे. सबंध जिल्ह्यातून आदिवासी आणि अन्य नागरिकांनी या सभेसाठी गर्दी केली आहे.

Sampat Devgire

Congress Vs BJP News: नंदुरबार लोकसभा मतदारसंघात आज प्रचाराची सांगता होत आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाने येथे प्रचारात पूर्ण ताकद लावली आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्यात मोठी चुरस निर्माण झाली आहे.

नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसचे (Congress) उमेदवार गोवाल पाडवी यांच्या प्रचारासाठी आज काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांची सभा होत आहे. या सभेसाठी नंदुरबारमध्ये अतिशय उत्साहाचे वातावरण आहे. सबंध जिल्ह्यातून आदिवासी आणि अन्य नागरिकांनी या सभेसाठी गर्दी केली आहे.

सभेसाठी काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांसह विविध नेते येथे दाखल झाले आहेत. यावेळी पटोले म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान म्हणून नव्हे तर व्यक्तिगत नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणून वक्तव्य करीत आहेत. त्यात कुठलेही राजकीय, राष्ट्रीय, देशाचे आणि समाजाचे प्रश्न नाहीत. हे जनतेलाही कळून चुकले आहे.

त्यामुळे त्यांच्या सभांना गर्दी होत नाही. काल त्यांची नंदुरबार येथे जाहीर सभा झाली. या सभेला स्थानिक नागरिकांची अजिबात गर्दी नव्हती. त्यामुळे गुजरातहून लोकांना आणावे लागले असा दावा त्यांनी केला.

नंदुरबारमध्ये यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी अतिशय संघटितरित्या काम करीत आहे. येथील जनता आणि आदिवासी गेल्या दहा वर्षांतील पंतप्रधान मोदी यांच्या कामकाजाला कंटाळले आहेत. त्यामुळे आमचा उमेदवार गोवाल पाडवी मोठ्या मताधिक्यांनी विजयी होईल. दहा वर्ष भाजप सत्तेत आहे. भाजपची भरभराट झाली असेल, मात्र जनतेला काय मिळाले?. बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि शेतकऱ्यांची लूट हे गेल्या दहा वर्षातील केंद्र सरकारच्या कामाचे फलित आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT