Nana Patole  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nana Patole On Narendra Modi : शरद पवारांवरील टीका नानांच्या जिव्हारी; पंतप्रधान मोदींचा घेतला समाचार...

PM Narendra Modi News : हे विधान म्हणजे भारतीय जनता पक्षाचा पराभव आहे. पंतप्रधान मोदी यांनी असे विधान करण्यापूर्वी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला आहे, हे जाहीर करायला हवे होते.

Sampat Devgire

Congress Vs BJP News: लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचारावर सर्वच पक्षांनी भर दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रात सभा होत आहेत. यामध्ये त्यांनी जेष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीका केली.

पंतप्रधान मोदी यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभेत विरोधी पक्षाच्या नेत्यांवर टीका केली होती. विशेषता ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर. शरद पवार यांना भाजपमध्ये येण्याचे ऑफर दिली होती.

शरद पवार यांच्यावर केलेल्या या टीके बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पटोले यांनी चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, पंतप्रधान महाराष्ट्रात प्रचारासाठी येतात. तेव्हा ते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेला नकली असे संबोधतात. शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला देखील त्यांनी नकली असे म्हटले. त्याचवेळी शरद पवार यांनी भाजपमध्ये (BJP) यावे असे विधान केले. जर हे नेते नकली असतील तर त्यांना तुमच्या पक्षात येण्याचे निमंत्रण का देता? हे विधान म्हणजे भारतीय जनता पक्षाचा पराभव आहे. पंतप्रधान मोदी यांनी असे विधान करण्यापूर्वी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला आहे, हे जाहीर करायला हवे होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काँग्रेसला (Congress) आरक्षण संपवायचे आहे त्यांना आदिवासींविषयी प्रेम नाही. या मोदी यांच्या वक्तव्याचाही त्यांनी चांगलाच समाचार घेतला. पटोले म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसला आदिवासी विषयी शिकवण्याचा प्रयत्न करू नये. भारतीय जनता पक्षाला आदिवासींविषयी किती प्रेम आहे, हे सर्वश्रुत आहे.

संसदेच्या नव्या इमारतीच्या लोकार्पण कार्यक्रमात त्यांनी राष्ट्रपतींना बोलावले नाही. लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न प्रदान करताना राष्ट्रपती उभ्या होत्या. मध्य प्रदेशमध्ये भाजपचे सरकार आहे. तेथे आदिवासीच्या तोंडात लघुशंका करण्याचा वाईट प्रकार घडला. हे सर्व भाजपचे आदिवासींविषयीचे कृत्य आहे. ते जनतेला चांगले ठाऊक आहे, असेही ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT