Udayanraje Bhosale : पंकजा मुंडेंसाठी उदयनराजे उतरले बीडच्या मैदानात...

Beed Lok Sabha Election 2024 : दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्याशी व त्यांच्या कुटुंबाशी खासदार उदयनराजे भोसले यांचे जवळचे संबंध आहेत. उदयनराजे यांच्या राजकीय वाटचालीत गोपीनाथ मुंडे यांचे मोठे योगदान आहे.
Udayanraje Bhosale
Udayanraje BhosaleSarkarnama

Satara, 11 May : मतदानानंतर थोडीशी विश्रांती घेतल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले आज (शनिवारी) बीड येथे पंकजा मुंडेंसाठी आयोजित केलेल्या सभेसाठी साताऱ्यातून विशेष हेलिकॉप्टरने रवाना झाले आहेत. बीडला मंत्री धनंजय मुंडे आणि खासदार उदयनराजे भोसले यांची पंकजा मुंडेंच्या प्रचारासाठी सभा आहे.

सातारा लोकसभेसाठी 7 मे रोजी मतदान झाले, आता तब्बल 24 दिवस निकालाची प्रतीक्षा आहे. मतदानानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी दोन, चार दिवस विश्रांती घेतली. आता मराठवाड्यात चौथ्या टप्प्यातील निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. यामध्ये बीडच्या भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्या प्रचारार्थ बीडला आज कृषी मंत्री धनंजय मुंडे व खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्या प्रमुख उपस्थितीत परळी वैद्यनाथ येथील मोंढा मैदानावर दुपारी तीन वाजता जाहीर सभा होणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Udayanraje Bhosale
Lanke On Ajitdada Statement : नीलेश लंके अजितदादांना भेटणार, महायुतीत धाकधूक वाढली...

या सभेसाठी स्टार प्रचारक म्हणून उदयनराजे भोसले हे बीडमध्ये (Beed) दाखल झाले आहेत. विशेष हेलिकॉप्टरने खासदार उदयनराजे भोसले हे आज दुपारी साताऱ्यातून बीडमध्ये आले आहेत. उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यातून भाजपच्या (BJP) तिकिटावर लोकसभेची निवडणूक लढवली आहे. तेथील मतदानानंतर उदयनराजे हे बीडमध्ये आले आहेत.

दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्याशी व त्यांच्या कुटुंबाशी खासदार उदयनराजे भोसले यांचे जवळचे संबंध आहेत. उदयनराजे यांच्या राजकीय वाटचालीत गोपीनाथ मुंडे यांचे मोठे योगदान आहे. गोपीनाथ मुंडे यांची कन्या पंकजाताई या यावेळेस बीड लोकसभेतून निवडणूक रिंगणात आहेत. उदयनराजेंनी पंकजा मुंडेंना आपली बहिण मानले आहे. त्यामुळे बहिणीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस असून त्यासाठी खासदार उदयनराजे भोसले हे स्टार प्रचारक म्हणून बीडच्या आजच्या सभेला गेले आहेत. ते आज दुपारी हेलिकॉप्टरने बीडमध्ये दाखल झाले आहेत. आज ते बीडमध्ये कोणावर बोलणार, याची उत्सुकता लागली आहे.

Udayanraje Bhosale
PDCC Bank Case : PDCC बॅंक मॅनेजरवरील कारवाई ही निव्वळ धूळफेक, ‘ते’ फुटेज सार्वजनिक करा; रोहित पवार आक्रमक

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com