Shirish Chaudhari arrest Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shirish Chaudhari arrest : शिंदेंच्या शिलेदाराच्या मिरवणुकीचा शेवट लॉकअपमध्ये! जातिवाचक अन् दरोड्याच्या गुन्ह्यात अटक; नंदुरबार तापलं

Former Shiv Sena MLA Shirish Chaudhari Arrested in Caste Abuse, Robbery Case : एकनाथ शिंदे शिवसेनेचे माजी आमदार शिरीष चौधरी यांना नंदुरबार पोलिसांनी अटक केल्याने राजकीय वातावरण तापलं आहे.

Pradeep Pendhare

Nandurbar political news : एकनाथ शिंदे शिवसेनेचे नंदुरबार इथले माजी आमदार शिरीष चौधरी यांना जातिवाचक शिवीगाळ करणे आणि दरोडा गुन्ह्याच्या अटक करण्यात आली.

पोलिसांच्या या कारवाईमुळे नंदुरबारमधील राजकीय वातावरण तापलं आहे. या कारवाईनंतर शिरीष चौधरी यांची प्रकृती खालवल्याने, त्यांना पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलं आहे.

नगरपालिकेत उपगराध्यक्ष निवडीनंतर नंदुरबार (Nandurbar) इथं शिरीष चौधरी यांच्या समर्थकांनी मिरवणूक काढली होती. शिरीष चौधरी यांच्या घरावर जमावानं हल्ला केला. हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांचा वापर करत, घराची तोडफोड केली होती. तसंच हल्लेखोरांनी त्यांच्या वाहन देखील जाळलं होतं. यानंतर दोन्ही बाजूनं परस्परविरोधी चार गुन्हे दाखल झाले.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेनेचे माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या घरावर हल्ला करणाऱ्या पाच संशियतांना पोलिसांनी अटक केली आहे. दोन्ही बाजूने दाखल झालेल्या गुन्ह्यात दरोडा, मारामारी, जातीवाचक शिवीगाळ करणे, अशा वेगवेगळ्या कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दोन्ही बाजूने पोलिस अधीक्षकांना निवदेन

एकनाथ शिंदे शिवसेनेच्या नगरसेवकांनी आणि दुसऱ्या बाजूने भाजपच्या नगरसेवकांसह महिला कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन निष्पक्षपणे कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान, शिरीष चौधरी यांनी पत्रकार परिषद घेत, हल्ल्यातील संशियत मार्च महिन्यात कशापद्धतीने शस्त्र घेऊन, गावात फिरत होते, याचा व्हिडिओ पत्रकारांना दाखवला. हल्लेखोर पक्षाशी संबंधित एका राजकीय नेत्यांशी संबंधित असल्याचा गंभीर आरोप शिरीष चौधरी यांनी करत खळबळ उडवून दिली.

चौधरी यांचे पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप

एकनाथ शिंदे शिवसेनेच्या नगरसेवकांनी आणि दुसऱ्या बाजूने भाजपच्या नगरसेवकांसह महिला कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन निष्पक्षपणे कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान, शिरीष चौधरी यांनी पत्रकार परिषद घेत, हल्ल्यातील संशियत मार्च महिन्यात कशापद्धतीने शस्त्र घेऊन, गावात फिरत होते, याचा व्हिडिओ पत्रकारांना दाखवला. हल्लेखोर पक्षाशी संबंधित एका राजकीय नेत्यांशी संबंधित असल्याचा गंभीर आरोप शिरीष चौधरी यांनी करत खळबळ उडवून दिली.

चौधरी पिता-पुत्राच्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल

तसंच पुढे, हल्ल्यातील संशयित हे हत्येतील आरोपी असून, अवैध धंदे चालक आहेत. हल्लेखोर संघटित गुन्हेगारी माहीर असून, त्यांच्याविरोधात 'मकोका', नुसार कारवाई करण्याची मागणी, शिरीष चौधरी यांनी केली होती. चौधरी यांच्या पत्रकार परिषदेतील आरोपानंतर दुसऱ्या बाजूने, एक व्हिडिओ प्रसारित करत, मिरवणुकीत माजी आमदार चौधरी आणि त्यांचे पुत्र उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरी यांनी घरापर्यंत येत केलेल्या मारहाणीचा दावा केला आहे. आरोप-प्रत्यारोपामुळे नंदुरबारमधील राजकीय वातावरण ढवळून निघत असतानाच, पोलिसांनी माजी आमदार शिरीष चौधरी यांना अटक केल्याने अधिकच खळबळ उडाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT