Vijaykumar Gavit  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Assembly Session : नंदुरबारच्या भूमाफियांना दणका, जमीन घोटाळ्यातील दोषींना थेट अटक करण्याचे आदेश

Nandurbar land scam, Vijaykumar Gavit : माजी आदिवासी विकास मंत्री व भारतीय जनता पार्टीचे आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी विधानसभेत नंदुरबारमध्ये गाजत असलेल्या जमीन घोटाळ्याप्रकरणी लक्षवेधी मांडली.

Ganesh Sonawane

Maharashtra assembly session : माजी आदिवासी विकास मंत्री व भारतीय जनता पार्टीचे आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी विधानसभेत नंदुरबारमध्ये गाजत असलेल्या जमीन घोटाळ्याप्रकरणी लक्षवेधी मांडली. त्यामुळे नंदुरबार मधील भूमाफियांना मोठा दणका बसला असून दोषींना अटक करण्याचे आदेश महसूलमंत्र्यांनी दिले आहेत. तर हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याने तहसीलदारांना थेट निलंबित करण्यात आले आहे.

डॉ. गावित यांनी मांडलेल्या लक्षवेधीला महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिलं. या जमीन घोटाळा प्रकरणात दोषींवर कारवाई करण्यास एक महिना उशीर केला म्हणून संबंधित तहसीलदारास निलंबित करण्याचे आदेश त्यांनी दिले. तसेच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून केली जाईल असं त्यांनी सांगितलं.

तर, मंडल अधिकारी पठाण यांच्याकडील अवैध नोंदी आणि तत्कालीन जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांचे वादग्रस्त महसुली आदेश या संदर्भात जे जे दोषी आढळले त्या सर्वांना अटक करा, असा आदेशच मंत्री बावनकुळे यांनी नंदुरबारच्या जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिले. महसुली विभागा अंतर्गत देखील चौकशी करण्याचे आदेश त्यांनी दिले. यासंदर्भात शंभर जणांना नोटीसा काढल्या जातील, असेही मंत्री बावनकुळे म्हणाले.

दरम्यान यावेळी डॉ. गावितांनी लक्षवेधी मांडताना भूमाफियांची कुंडलीच मांडली. टोकर तलाव येथील कामगार इनामजमीन बेकायदा ताब्यात घेऊन नजराणा न भरता नावावर हस्तांतरित करणे, ढेकवद शिवारातील गट नंबर ४४ वरील जमिनीसंबंधित कुळ कायदा कागदपत्रे बदलवून हस्तांतरित करणे, नंदुरबार शिवारातील सरकारी पडीत जमीन तसेच, गट नंबर ४०५ वरील गुरुचरण जमीन, देवस्थान इनाम जमीन परस्पर हस्तांतरित करणे असे अनेक गैरप्रकार केले गेले आहेत.

तत्कालीन जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांच्या आदेशांचा गैरवापर करून जमिनी हडप केल्याची २० प्रकरणे समोर आली होती. परंतु, चौकशी समितीमार्फत एफआयआर दाखल करताना संबंधित बड़े बिल्डर आणि नेत्यांची नावे वगळण्यात आली होती. त्या सर्वांवर गुन्हे दाखल होणे आवश्यक आहे. तक्रारीच्या आधारे नंदुरबारच्या उपविभागीय अधिकारी अंजली शर्मा यांनी स्वतः नंदुरबार शहरातील रेल्वे स्टेशन रोडवर महसूलच्या जुन्या इमारतीत अचानक छापा टाकून या कार्यालची झाडाझडती घेतली होती. त्यानंतरही महिनाभर संबंधित तहसीलदारांनी कारवाई केली नव्हती, नंतर २५ जून २०२५ रोजी नायब तहसीलदार नितीन रमेश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नंदुरबार पोलिस ठाण्यात निवृत्त मंडल अधिकारी झाकीर एम. पठाण यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.पठाण यांनी शासकीय अधिकारी असल्याचे भासवून विविध सरकारी नोंदी ताब्यात ठेवल्याचा आरोप आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT