
Malegaon News : पावसाळी अधिवेशनात मालेगावच्या दोन महत्वाच्या प्रश्नांवरील लक्षवेधी सूचना गाजल्या. यापूर्वी रक्तमिश्रीत पाण्याची लक्षवेधी सूचना विधानभवनात गाजली तर गुरुवारी (ता. 18) मालेगावातील सायजिंग उद्योगसंदर्भात भाजपचे आमदार डॉ. परिणय फुके व आमदार प्रवीण दरेकर यांनी लक्षवेधी सूचना मांडल्या.
गेल्या अनेक वर्षांपासून मालेगावच्या मोसम नदीत सोडले जाणारे रक्त मिश्रीत पाण्यासाठी लढा सुरु आहे. आमदार विक्रांत पाटील यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडून शासनाचे लक्ष वेधले. तसेच आमदार प्रवीण दरेकर यांनी देखील हा प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर मंत्री उदय सामंत यांनी महत्वाची घोषणा केली होती.
मोसम नदी, गिरना नदीच्या संगमामध्ये आणि गोदावरी नदीपात्रांमध्ये हे रक्त मिश्रित पाणी सोडले जात आहे. त्यामुळे हिंदूच्या भावना भडकल्या आहेत, असे आ. विक्रांत पाटील म्हणाले होते. त्यावर मंत्री उदय सामंत यांनी बेकायदेशीर कत्तलखान्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर आता मालेगावमधील अवैध कत्तलखान्यांवर लवकरच हातोडा पडणार आहे. त्यामुळे या लढ्याला यश आल्याचे दिसत आहे अशी भावना मालेगाव नागरी सुविधा समितीचे अध्यक्ष रामदास बोरसे यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान बोरसे यांनी गेल्या महिन्यातच बकरी ईदच्या दिवशी रक्त मिश्रित पाण्याच्या विरोधात आंदोलन केलं होतं. आमदार पाटील म्हणाले की, मालेगाव शहरात मोठ्या प्रमाणात अवैध कत्तलखाने आहेत. या कत्तलखान्याच्या माध्यमातून मोसम नदीपात्रात रक्त मिश्रित पाणी सोडले जाते. महापालिकेने 27 व्यवसायिकांना सूचना दिल्या आहेत. मात्र त्यांच्यावर अद्याप कोणतेही कारवाई केलेली नाही असं त्यांनी म्हटलं.
ते म्हणाले, मालेगाव महापालिकेचा केवळ एकच कत्तलखाना आहे. या कत्तलखान्यात कत्तल न करता शहरातील रस्त्यांवर तसेच अनेक घरात जनावरांची कत्तल होते. गटारीद्वारे रक्त मिश्रित पाणी मौसम नदीत येते. त्यामुळे हे सर्व अवैध कत्तलखाने बंद करावेत. महापालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. यावेळी मंत्री उदय सामंत म्हणाले की, कुरेशी मोहल्ला ते सरदार चौक या भागात कत्तलखाने आहेत. पोलिसांना सूचना देऊन अवैध कत्तलखान्यांवर कारवाई केली जाणार आहे.
त्यानंतर आमदार डॉ. परिणय फुके व आमदार प्रवीण दरेकर यांनी (दि. 17) जुलै ला मालेगावातील सायजिंग उद्योग व प्रदूषण संदर्भात लक्षवेधी मांडून मंत्री पंकजा मुंडे यांना घेरलं. आमदार फुके म्हणाले, मालेगाव महापालिका क्षेत्रात 159 सायजिंग आहेत. या सायजिंग मालकांनी बनावट दस्तऐवज दिले आहेत का त्याची तपासणी व्हावी. तसेच बॉयलरमध्ये प्लॅस्टिक कचरा जाळला जातो. त्यामुळे शहरात प्रदूषण होऊन नागरिकांना त्वचा विकार व फुफ्फुसांचे आजार होतात. या उद्योगांवर कारवाई करणार का तसेच खोट्या दस्तऐवजाद्वारे परवानगी घेतलेल्यांवर कारवाई होईल का असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
तसेच आमदार दरेकर यांनी देखील जागा, बांधकाम परवानगी यासह विविध प्रश्न उपस्थित केले. यावेळी मंत्री पंकजा मुंडे यांनी उत्तर दिलं. त्या म्हणाल्या की, यापूर्वी जनता, संतोष, नजिरा, मोहम्मदी या सायजिंगवर कारवाई केली आहे. येथील सायजिंगमध्ये प्लॅस्टिक जाळत असतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. बॉयलर संदर्भात तपास करून कारवाई करू. 159 सायजिंगवर कारवाई करणे योग्य ठरणार नाही असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.