Ajit Pawar-Narhari Zirwal  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Narhari Zirwal : फडणवीस, पवार अन् शिंदे राज्य सुधारवत आहे, मग बीड...; झिरवाळांना भलताच विश्वास...

NCP Shirdi convention : मंत्री नरहरी झिरवाळ यांनी शिर्डीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवसंकल्प शिबिरात सहभागी होताना बीड जिल्ह्यातील पालकमंत्री पदाबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

Pradeep Pendhare

Shirdi, 19 January : राज्यातील पालकमंत्रिपदाच्या नियुक्ती जाहीर झाल्या आहेत. काही नेत्यांकडे दोन जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. यात मंत्री धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्याची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली आहे. आता बीड जिल्ह्यातील परिस्थिती सुधारेल का? अशी चर्चा आहे यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेते तथा मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मोठी प्रतिक्रिया दिली.

नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) म्हणाले, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य सुधारण्याची जबाबदारी स्वीकारलेली आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यात सुधारणा करण्यात काही अवघड नाही".

अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुण्यासह बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यावर बोलताना नरहरी झिरवाळ यांनी अजितदादांकडेच नाही, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देखील दोन जिल्ह्यांची जबाबदारी आहे. मंत्री शिंदे यांच्याकडे ठाण्यासह मुंबईची जबाबदारी देण्यात आली आहे. अशी अनेक नेत्यांकडे, मंत्र्यांकडे पालकमंत्रिपदी म्हणून महत्त्वपूर्ण जिल्हे देण्यात आले आहेत. यामागे महायुतीचा काहीतरी मोठा विचार असेल, त्यातूनच ही जबाबदारी देण्यात आली आहे, असे नरहरी झिरवाळ यांनी म्हटले.

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडे हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी आहे. यावर बोलताना निव्वळ आदिवासी आहे, म्हणून माझ्याकडे आदिवासी खाते द्यायचे असं काही नाही. मी किंवा कोणताही आदिवासी मंत्री हा जनरल जिल्हा सांभाळू शकतो, असे नरहरी झिरवाळ यांनी स्पष्ट केले.

अजित पवार यांनी विधानसभेच्या उपाध्यक्षपदी एससी (शेड्युल कास्ट) समाजाच्या लोकप्रतिनिधीला संधी देणार, असे जाहीर केले आहे. आदिवासी समाजाला अजितदादांनी न्याय दिला आहे. तसाच शेड्यूल कास्टला न्याय देण्याची भूमिका अजितदादांनी ठेवली आहे. राज्यपालांनी आदिवासी समाजाच्या लोकप्रतिनिधींची बैठक बोलावली आहे. यावर नरहरी झिरवाळ यांनी आमच्या समाजातील काही अडचणी आहेत. त्या सोडवण्यासाठी आम्हाला राज्यपालांशी भेटायचे आहे. तसेच, केंद्र व राज्य सरकारने राज्यपालांना काही अधिकार दिले आहेत. या सर्व अडचणी घेऊन आम्ही त्यांना भेटणार आहोत, असे नरहरी झिरवाळ यांनी सांगितले.

शिर्डीतील साईसमाधी देवस्थान परिसरात दरवर्षी कोट्यवधी रुपयांच्या मिठाईच्या प्रसादाची विक्री होते. यात मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्याच्या तक्रारी आहेत. यावर मंत्री नरहरी झिरवाळ यांनी साईसमाधी मंदिर परिसरातील सर्व मिठाई विक्रेत्यांची तपासणी केली जाईल. भेसळ आढळल्यास कारवाई होईल, असे आश्वासन दिले.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT