Sharad Koli-Narayan Rane Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Maratha Reservation : राणेंनी जरांगेंचे मराठा आंदोलन संपविण्याची सुपारी घेतली; शिवसेना नेत्याचा आरोप

कैलास शिंदे

Jalgaon News : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा मुलगा कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी आंदोलन करतोय आणि ते ९६ कुळी मराठा असल्याचे सांगत आहेत. त्यांच्या घरात त्यांना मेळ लागत नाही. ते बाहेर मोठ्या वल्गना करीत आहेत. त्यांनी आरक्षणासाठी सुरू असलेले मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन संपविण्याची सुपारी घेतली आहे, असा खळबळजनक आरोप शिवसेनेचे उपनेते शरद कोळी यांनी केला. (Narayan Rane has taken the betel nut to end Jarange's Maratha agitation: Sharad Koli)

जळगाव येथे कोळी समाजाचे सरसकट जात प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे. त्या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी शरद कोळी जळगाव येथे आले होते. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगर प्रमुख शरद तायडे उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कोळी म्हणाले की, नारायण राणे म्हणतात आम्ही ९६ कुळी मराठा आहोत, त्यामुळे आम्हाला कुणबी आरक्षण नको. मात्र, त्यांचा मुलगा कुणबी मराठा समाजासाठी आंदोलन करीत आहे. त्यामुळे त्यांच्या घरात प्रश्‍न निर्माण झाला आहे. नारायण राणे यांनी जरांगे यांचे मराठा आरक्षणाचे आंदोलन संपविण्याची सुपारी घेतली असल्याचा संशय येत आहे. मात्र, त्यांनी कितीही विरोध केला तरी मनोज जरांगे यांचे आंदोलन योग्य आहे. ते निश्‍चित आरक्षण घेणारच आहेत.

राज्यातील सरकार बेकायदेशीर असल्याचे मत व्यक्त करून ते म्हणाले, की देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी गोड बोलून सर्वच समाजाला फसविले आहे. आगामी काळात राज्यातील जनता तिघांना आपली जागा दाखवून देईल.

दाखले मिळतील किंवा महापूजा होईल

कोळी समाजाला सरसकट जात प्रमाणपत्र द्या, अशी शरद कोळी यांनी केली. कोळी समाजाला जर या सरकारने न्याय दिला नाही तर पंढरपूर येथे कार्तिकी एकादशीची महापूजा मंत्र्यांच्या हस्ते होऊ दिली जाणार नाही. एकतर कोळी समाजाला दाखले मिळतील किंवा महापूजा होईल. आम्ही केवळ इशारा देत नाही, तर प्रत्यक्ष कृती करून दाखवितो, असा इशाराही कोळी यांनी दिला.

फडणवीसांनी खोटा जीआर दाखवला

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, कंत्राटी भरतीबाबत कॉंग्रेस सरकारच्या काळातील फडणवीस यांनी जीआर दाखविला आहे. मात्र, हे सरकार अत्यंत खोटारडे आहे. त्यामुळे त्यांनी जीआरही खोटेचे दाखविले असतील, हे काहीही करू शकतात. कंत्राटी भरतीच्या माध्यमातून भाजपला शासकीय कार्यालयात गुंड भरावयाचे आहेत. आगामी काळात सर्व शासकीय कार्यालयात गुंड लोक दिसून येतील.

ड्रगमाफिया ललित पाटील प्रकरणात खऱ्या अर्थाने सरकारचीच नार्को टेस्ट करण्याची गरज आहे. पाटील याला फरार केल्याप्रकरणी त्यांच्या सहकारी मंत्र्यांवर गुन्हा दाखल करून सरकारने कारवाई करावी, अशी मागणी शरद कोळी यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT