Narendra Modi Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

National Youth Festival: नववर्षाच्या सुरुवातीलाच पंतप्रधान मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर; कारण काय ?

संपत देवगिरे

Nashik News: आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध स्तरावर उपक्रमांची आखणी केली आहे. यासंदर्भात येत्या 12 ते 16 जानेवारी दरम्यान राज्यात राष्ट्रीय युवा महोत्सव होणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी नाशिक येथे करणार आहेत.

राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या आयोजनासाठी केंद्र व राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी केली. 12 ते 16 जानेवारी दरम्यान होणाऱ्या या महोत्सवाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधान मोदी यांची सुरक्षा आणि होणारी गर्दी लक्षात घेता गेल्या तीन दिवसांपासून पोलिस यंत्रणा आणि केंद्रीय यंत्रणा नाशिक शहरात जागेचा शोध घेत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या महोत्सवाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असून, या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारच्या पथकाने गुरुवारी कार्यक्रमाच्या जागेची पाहणी केली. यामध्ये साधुग्राम येथील मैदानाला पसंती देण्यात आल्याचे बोलले जाते. लवकरच ही जागा निश्चित होण्याची शक्यता आहे.

या महोत्सवानिमित्त विविध स्पर्धा होणार आहेत. त्यासाठी कालिदास कलामंदिर, महात्मा फुले कला दालन, शालिमार, रावसाहेब थोरात हॉल, गंगापूर रोड, उदोजी मराठा शैक्षणिक वारसा संग्रहालय, गंगापूर रोड, ठक्कर डोम ही ठिकाणे निश्चित झाली आहेत. तेथे सुविधांची उभारणी केली जात आहे.

याच मैदानावर यापूर्वी 2019 मध्ये याच मैदानावर मोदी यांची सभा झाली होती. सध्या देशात लोकसभा निवडणुकीचे वातावरण आहे. महाराष्ट्रात भाजपने पंचेचाळीस प्लस असे उद्दीष्ट जाहीर केले आहे. प्रत्यक्षात जनमाणसातील कल तसेच अन्य सर्वे भाजपचे उद्दीष्ट साध्य होईल, याबाबत साशंकता व्यक्त करणारे आहेत.

त्यामुळे भाजपची निवडणूक यंत्रणा अधिक जोमाने कामाला लागली आहे. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्रात पंतप्रधान मोदी यांचे दौरे वाढण्याची शक्यता आहे. तसेच भारतीय जनता पक्षाने आगामी लेकसभेची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात देखील आगामी लोकसभेच्या प्रचाराचा नारळ फुटणार आहे.

(Edited by- Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT