Maharashtra Latest News : राज्य सरकारमधील पदांवर कंत्राटी नोकर भरतीविरोधात विरोधी पक्ष आक्रमक झाले होते. राज्यात याविरोधात आंदोलनेही झाली. मोठी टीका झाल्यानंतर आणि तरुणांमध्ये रोष निर्माण झाल्यावर राज्य सरकारने कंत्राटी नोकर भरतीचा निर्णय मागे घेतला होता. आता आरोग्य विभागात होणाऱ्या कंत्राटी नोकर भरतीचा निर्णयही मागे घेण्यात आला आहे. आरोग्य विभागातील कंत्राटी नोकर भरतीवरून राज्य सरकारवर मोठी टीका करण्यात आली होती.
राज्यातील कंत्राटी भरतीचा निर्णय राज्य सरकारने मागे घेतला. पण आरोग्य विभागात कंत्राटी पद्धतीने नोकर भरतीसाठी हजारो कोटींच्या सेवा ठेकेदारांमार्फत घेण्यासाठी निविदा काढण्यात आल्या होत्या. आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या खात्यात लागोपाठ निविदा काढण्यात आल्या. यापैकी 638 कोटींची एक वार्षिक निविदा रद्द करण्यात आली आहे. 30 ऑक्टोबर 2023 रोजी ही निविदा काढण्यात आली होती. सरकारी रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रांची यांत्रिकी पद्धतीने साफसफाई करण्याठी ही निविदा काढली होती. अशा प्रकारे 5 वर्षांसाठी 3200 कोटी रुपये ठेकेदाराला देण्यात येणार होते.
ठाण्यातील कळवा आणि नांदेडमधील शासकीय रुग्णालयात एकाच दिवसांत अनेक रुग्णांचे मृत्यू झाले होते. या घटना काही दिवसांच्या अंतरात घडल्या होत्या. त्यानंतर आरोग्य विभागातील कंत्राटी नोकर भरतीचा मुद्दा ऐरणीवर आला होता. विरोधी पक्षांनी राज्य सरकारला घेरले होते. आरोग्य विभागात कंत्राटी नोकर भरती केल्यास रुग्णाच्या मृत्यूला आणि अनुचित घटनेला जबाबदार कोण असेल? असा प्रश्न विचारण्यात आला होता.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आरोग्य विभागात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप केला होता. आरोग्य विभागातील पदे आणि बदल्यांसाठी रेट कार्ड असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला होता. एमपीएससी मार्फत 14 उपसंचालकांची निवड झाली. पण त्यांच्याकडे नियुक्तीसाठी 50 लाखांची मागणी केली गेली. त्यांनी ती पूर्ण न केल्याने मुंबई, पुण्यात साईड पोस्टिंग दिली गेली, असा आरोपही संजय राऊत यांनी केला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.