Dhanraj Mahale & Narhari Zirwal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Narhari Zirwal Politics: नरहरी झिरवाळ अडचणीत; महायुतीत बंडाचा झेंडा फडकला!

Former MLA Dhanraj Mahale Revolts: शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार धनराज महाले यांनी बंडखोरीची घोषणा केल्याने आमदार झिरवाळ अडचणीत.

Sampat Devgire

Dindori News: दिंडोरी मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने नरहरी झिरवाळ यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या घोषणेनंतर मतदार संघात त्यांच्या विरोधकांत संमिश्र पडसाद उमटले आहेत. त्यामुळे महायुतीतच बंडखोरीची चिन्हे आहेत.

विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या अडचणी दूर होण्याची चिन्हे नाहीत. प्रारंभी घरातूनच मुलगा गोकुळ झिरवाळ यांनी निवडणुकीसाठी उमेदवारीची घोषणा केली होती. आता गोकुळ झिरवाळ शांत झाले आहेत.

महायुतीच्या घटक पक्षातील अन्य इच्छुकांनी मात्र बंडाचे निशांत फडकवले आहे. त्यामुळे आमदार झिरवाळ या सर्व अडचणींवर काय तोडगा काढतात याची उत्सुकता आहे. एक मोठा गट माजी आमदार महाले यांच्या सोबत आहे.

आमदार झिरवाळ सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे उमेदवार आहेत. महायुतीचे उमेदवार म्हणून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मात्र शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे माजी आमदार धनराज महाले यांनी बंडाचे निशाण फडकवले आहे.

माजी आमदार महाले येत्या 24 ऑक्टोबरला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यासाठी त्यांनी समाज माध्यमांवर महायुतीचे कार्यकर्ते आणि समर्थकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

आमदार झिरवाळ यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवार जाहीर झालेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून येथे उमेदवार दिला जाणार आहे. सध्या येथे सुशीला रामदास चारोस्कर, संतोष रेहरे, मधुकर भरसट आणि प्रा. अशोक बागुल हे चार इच्छुक उमेदवार आहेत.

या इच्छुकांमध्ये माजी आमदार रामदास चारोस्कर यांच्या पत्नी म्हणून सुशीला चारस्कर यांना प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास निष्ठावंत गटाकडून त्यांच्या उमेदवारीला विरोध होईल, अशी चिन्हे आहेत. चारोस्कर यांना उमेदवारी मिळाल्यास जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संतोष रेहरे बंडखोरी करण्याची शक्यता आहे.

या सर्व स्थितीत दिंडोरी मतदार संघातील राजकीय स्थिती अत्यंत अशांत बनली आहे. बंडखोरी केल्याने नरहरी झिरवाळ यांना राष्ट्रवादी काँग्रेस मधूनच आव्हान मिळत आहे. आता महायुतीकडून देखील त्यांना बंडखोरीचे आव्हान मिळत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या श्रीराम शेटे यांच्या विरोधात सहकार्यात सक्रिय असलेल्या नेत्यांकडून महाले यांना पाठिंबा मिळेल. कादवा साखर कारखाना, बाजार समिती आणि अन्य सहकारी संस्थांतील एक गट माजी आमदार महाले यांना अनुकूल आहे.

या स्थितीत विधानसभेचे उपाध्यक्ष झिरवाळ यांच्या मतांची विभागणी होऊ शकते. त्यामुळे महायुतीतील बंडखोरी टाळण्यासाठी झिरवाळ वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात आहेत. माजी आमदार महाले यंदा कोणत्याही स्थितीत माघार घेण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यांनी तशी घोषणाच केली आहे. त्यामुळे दिंडोरी मतदार संघात महाविकास आघाडी उमेदवार आयात करणार की निष्ठावंतला संधी देणार याची मोठी उत्सुकता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT