Nashik bribery case Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Corruption : नाशिकमध्ये लाचखोरीचा कहर ; २१० अधिकारी ACB च्या जाळ्यात, मुंबई-पुण्यालाही टाकलं मागे..

Nashik corruption case 210 officers caught: शासकीय कामकाज करण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांना मोठे वेतन मिळते. मात्र तरीही त्यांना लाचखोरीचा मोह सुटत नसल्याचे धक्कादायक वास्तव आहे. त्यात नाशिक सर्वात आघाडीवर आहे.

Ganesh Sonawane

ACB Nashik bribery crackdown 2026: सरकारी बाबूंना भरघोस पगार मिळूनही लाचखोरीचा मोह सुटत नसल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. गेल्यावर्षी २०२५ मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) ने केलेल्या कारवायांमध्ये नाशिक परिक्षेत्र राज्यात अव्वल ठरले असून, तब्बल २१० अधिकारी व कर्मचारी लाच घेताना जाळ्यात अडकले आहेत.

ACB ने २०२५ मध्ये राज्यातील ८ परिक्षेत्रात ६६९ कारवाया करून ९८८ लाचखोरांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्यात नाशिक विभाग आघाडीवर असून, सर्वाधिक २१० लाचखोर एसीबीच्या जाळ्यात सापडले आहेत.

तर नाशिकनंतर दुसऱ्या स्थानावर पुण्याचा नंबर लागतो. पु्यात १७६ लाचखोरांवर कारवाई केली आहे. तर राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये लाचखोरीचे प्रमाण सर्वात कमी आहे. गेल्या वर्षात मुंबई परिक्षेत्रात केवळ ३९ गुन्हे दाखल असून, लाच घेताना ६२ आरोपी जाळ्यात अडकले आहेत.

राज्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची प्रशासकीय सोईसाठी ८ मुख्य परिक्षेत्रांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. ज्यामध्ये मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नांदेड आणि अमरावती या प्रमुख शहरांमध्ये परिक्षेत्रीय कार्यालये आहेत. या परिक्षेत्रांतर्गत लाच घेणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर एसीबीची नजर असते.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) ने २०२५ मध्ये वरील सर्व आठ परिक्षेत्रात एकुण ६६९ कारवाया केल्या. त्यात एकुण ९८८ अधिकारी, कर्मचारी लाच घेताना एसीबीच्या गळाला लागले आहेत.

त्यामध्ये नाशिक परिक्षेत्रात तर लाचखोरीचा कहर पाहायला मिळाला आहे. सर्वाधिक लाचखोर नाशिक परिक्षेत्रात असल्याचे समोर आले. नाशिक परिक्षेत्रात १३८ कारवाया एसीबीने केल्या असून, २१० लाचखोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

२०२५ मध्ये परिक्षेत्रनिहाय लाचखोर आरोपी

नाशिक -२१०

पुणे -१७६

छत्रपती संभाजीनगर- १६०

ठाणे-१२४

अमरावती -१००

नांदेड-७८

मुंबई ६२

लाचखोरीतून अपसंपदा जमवणाऱ्यांवरही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या वर्षभरात उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता जमा केल्याप्रकरणी १७ आरोपींविरुद्ध ९ गुन्हे दाखल करण्यात आले असून, नांदेड परिक्षेत्रात सर्वाधिक ४ प्रकरणे उघडकीस आली आहेत. तसेच मर्यादेपेक्षा अधिक मालमत्ता जमविल्याप्रकरणी मुंबई परिक्षेत्रात २, ठाणे परिक्षेत्रात २ आणि पुणे परिक्षेत्रात २ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT