Nashik ZP News : नाशिक झेडपीत ACB च्या एकापाठोपाठ तीन कारवाया ; CEO ओमकार पवार अॅक्शन मोडवर, दोन मोठे निर्णय..

Nashik Zilla Parishad CEO Omkar Pawar Action : मागील काही दिवसांत ACB ने केलेल्या कारवायांमुळे जिल्हा परिषदेची प्रतिमा मलिन झाली असून आता सीईओ ओमकार पवार अॅक्शन मोडवर आले आहेत.
Nashik Zilla Parishad CEO Omkar Pawar
Nashik ZP CEO Omkar PawarSarkarnama
Published on
Updated on

Nashik Zilla Parishad : नाशिक जिल्हा परिषदेत एसीबीच्या एकापाठोपाठ तीन कारवाया झाल्यानंतर जिल्हा परिषदेची प्रतिमा मलिन झाली आहे. त्यानंतर सीईओ ओमकार पवार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून ते अॅक्शन मोडवर आले आहेत. भ्रष्टाचाराला रोखण्यासाठी त्यांनी कडक पावले उचलली आहेत. कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी त्यांनी दोन मोठे निर्णय घेतले आहेत.

यापुढे जिल्हापरिषदेची फाईल जर त्रयस्थ व्यक्तीच्या हातात दिसली तर संबधित कर्मचाऱ्याला थेट घरी पाठवू अर्थात निलंबन करण्याचा इशारा सीईओ ओमकार पवार यांनी दिला आहे. काही विभागांमध्ये महत्त्वाच्या फायली परिचरांऐवजी त्रयस्थ व्यक्तींच्या हाती सोपविल्या जातात. ज्यामुळे कागदपत्रे गहाळ होण्याचे प्रकार घडतात.

तसेच यातून गोपनिय माहिती फुटण्याची तसेच आर्थिक गैरव्यवहार होण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे आता फायलींची ने-आण केवळ अधिकृत कर्मचाऱ्यांमार्फतच होईल, तीही सीसीटीव्हीच्या नजरेत राहणार आहे, तसा आदेशच जिल्हा परिषद प्रशासनाने जारी केला आहे.

तसेच तालुका पातळीवरील अनेक अधिकारी व कर्मचारी कोणतेही ठोस कारण नसताना जिल्हा परिषद मुख्यालयात फिरताना दिसतात. याचा परिणाम मूळ कामावर होत असतो. यावर चाप लावण्यासाठी देखील सीईओ ओमकार पवार यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे जिल्हा परिषदेत येणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला आपल्या कार्यालय प्रमुखाची परवानगी आणि रजेचे पत्र सादर करावे लागणार आहे. (Nashik News)

Nashik Zilla Parishad CEO Omkar Pawar
Nashik ZP : नाशिक जिल्हा परिषदेची ई-गव्हर्नन्समध्ये भरारी; CEO ओमकार पवारांचा CM फडणवीसांच्या हस्ते सन्मान

एवढेच नाही तर त्यांची नोंद स्वतंत्र अभ्यागत नोंदवहीत केली जाणार आहे. यासाठी प्रत्येक विभागात एका परिचर कर्मचाऱ्याची नियुक्ती केली जाणार आहे. सीईओ ओमकार पवार यांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे.

Nashik Zilla Parishad CEO Omkar Pawar
Nashik ZP : ओमकार पवारांनी करुन दाखवलं, 'त्या' 263 बालकांचे आयुष्य बदलले, सीईओ झाल्यावर हाती घेतलेला पहिलाच उपक्रम यशस्वी

आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय प्रतिपूर्ती देयकांमध्ये होणारी दप्तरदिरंगाईमुळे लाचखोरी वाढते. त्यावर आळा घालण्यासाठी आरोग्य विभागाने कोणत्याही परिस्थितीत १५ दिवसांच्या आत वैद्यकीय बिलांना तांत्रिक मान्यता देणे बंधनकारक केले आहे. यात दिरंगाई झाल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर दप्तरदिरंगाई कायद्याअंतर्गत शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी दिला. पदोन्नती, वेतनवाढी आणि रजा वेतन यांसारखी प्रलंबित प्रकरणे तत्काळ मार्गी लावण्याचे आदेश त्यांनी विभागप्रमुखांना दिले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com