Nashik TCS case : निदा खानचा 20 दिवसांपासून पोलिसांना गुंगारा, नेमकी कुठे लपली? धक्कादायक माहिती आली समोर...

Nida Khan absconding : नाशिकमधील TCS कंपनीत हिंदू महिलांचा छळ व धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाला. याप्रकरणात कंपनीची एचआर निदा खान हीच मास्टरमाइंड असल्याचं समोर येत असून ती फरार आहे.
Nida Khan
Nida Khan Sarkarnama
Published on
Updated on

Nashik Crime News : नाशिकच्या TCS या बहुराष्ट्रीय आयटी कंपनीत मुस्लीम तरुणांकडून हिंदू महिला-मुलींचा विचित्र छळ करण्यात आला. हिंदू मुलींचे लैगिंक शोषण तसेच धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाला. याप्रकरणी पीडित हिंदू तरुणींनी कंपनीची एचआर मॅनेजर असलेल्या निदा खानकडे तक्रार करुनही तीने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. त्यांच्या तक्रारी वरिष्ठांपर्यंत पोहचवल्या नाहीत. त्यामुळे एचआर निदा खान हीच याप्रकरणाची मास्टरमाइंड असून तीने तक्रार दाबण्याचा व आरोपींना वाचवण्याच प्रयत्न केला.

फेब्रुवारी २०२२ ते मार्च २०२६ दरम्यान या सर्व घटना घडल्या. याप्रकरणी आतापर्यंत ९ गुन्हे दाखल आहेत. ९ जणांनी छळ, अत्याचार, आणि जबरदस्तीने धर्मांतर असे आरोप केले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी ७ पुरुष व एका महिलेला अटक केली आहे. परंतु हे गुन्हे दाखल होताच फरार झालेली निदा खान मात्र अद्याप तपास यंत्रणांच्या हाती लागलेली नाही. २० दिवसांपासून ती तपास यंत्रणांना गुंगारा देत असून गायब आहे. तपास पथकांकडून तिचा कसून शोध घेतला जात आहे.

दरम्यान फरार निदा खान बाबत आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. निदा खानचे दिल्ली स्फोटातील आरोपीसोबत कनेक्शन असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. निदा खान ही दहशतवाद्यांच्या संपर्कात असल्याचं म्हटलं जात असून यामुळे आता या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळालं आहे. आता केवळ नाशिक पोलिसच नाही तर केंद्रीय तपास यंत्रणाही या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Nida Khan
Nashik Crime : नाशिक पुन्हा हादरलं! शिंदेंच्या नेत्यावर टोळक्याचा जीवघेणा हल्ला, कार्यालयाबाहेरच कोयत्याने सपासप वार केले अन्...

निदा खान ही भिवंडीत लपली असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच दिल्लीमध्ये झालेल्या भीषण ब्लास्टमधील आरोपी डॉ. शहीनशी तीचे कनेक्शन असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे हे प्रकरण आता व्यापक स्तरावर पोहोचलं असून ATS ने या प्रकरणाचा तपास हाती घेतला आहे, स्वतः एटीएस कडून ताब्यात असलेल्या आरोपींची चौकशी केली जाणार आहे.

निदा एजाज खान असं तीचं नाव आहे. वय वर्ष २६ आहे. पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून तिने पदवी घेतली आहे. निदा खान TCS नाशिक बीपीओ युनिटमध्ये एचआर मॅनेजर आहे. नाशिकच्या द्वारका परिसरात निदा खान हिचे माहेर असून तिचे पती एका खाजगी कंपनीत नोकरी करत असल्याची माहिती आहे. कंपनीतील पॉश (लैंगिक छळ प्रतिबंध) समितीमध्ये ती होती. असे असतानाही तीने पीडितांना वारंवार तक्रार मागे घेण्यास सांगितल्याचा आरोप आहे. 2021 पासून निदा खान ही TCS कंपनीत काम करत होती. कंपनीत नवीन हिंदू महिला किंवा तरुणी कर्मचारी म्हणून रुजू झाल्यानंतर त्यांना या आरोपींकडून ट्रेनिंग देण्याची शिफारस निदा खान करत असे.

Nida Khan
Nashik Crime : ‘कॉर्पोरेट कंपनीत असं होत राहतं...’ पीडित हिंदू तरुणींनी मेल केला पण एचआरने दुर्लक्ष केलं... तपासात धक्कादायक माहिती उघड

आरोपींच्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात आणि ठरवलेल्या धर्मांतर षड्यंत्रात हिंदू मुलींना अडकवण्यासाठी निदा खानची मुख्य भूमिका होती. हिंदू मुलींचे पद्धतशीरपणे ब्रेनवॉश करण्याचे काम ती करत असे. या प्रकरणात आरोपींना आर्थिक मदत देखील ती करत असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे या प्रकरणामागे काही आंतरराष्ट्रीय रॅकेट असल्याचा संशय आहे. त्यामुळे याप्रकरणात निदा खान पोलिसांच्या हाती लागणे महत्वाचे आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com