Trimbak Sadhu Meeting Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ayodhya Ram Temple Robbery: श्रीराम मंदिरातील कथित अपहारावर मोठा स्फोट; आखाडा परिषदेतील साधू संतप्त, योगी सरकारवर वाढला दबाव

Nashik Akhara Parishad Sadhu aggressive in Ayodhya Ram temple donation theft case: अयोध्येतील श्रीराम मंदिरातील चोरीमुळे साधू-संतांच्या मागणीने विरोधकांच्या हाती आयते कोलीत

Sampat Devgire

Akhada Parishad News: अयोध्येतील राम मंदिर विश्वस्त वादात सापडले आहेत. मंदिराच्या दानपेटीतील रक्कम आणि सोन्या-चांदीच्या वस्तूंच्या अपहाराच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. त्यावरून साधूंनी घेतलेल्या भूमिकेने नव्या वादाला तोंड फुटले आहे. 

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर देशभरातील आखाडा परिषदेचे प्रतिनिधी त्र्यंबकेश्वर येथे एकत्र आले आहेत. त्यात अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या दोनपेटीत तसेच भक्तांनी दिलेल्या दानाच्या रक्क्मेचा अपहार यावर चर्चा झाली. त्यामुळे अयोध्येतील श्रीराम मंदिराचा विषय तापला.

दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत आखाडा परिषदेचे महामंत्री हरीगिरी यांनी मंदिरातील चोरीबाबत गोपनीय पद्धतीने चौकशी करण्यात येईल. अयोध्येतील राम मंदिरात नेमके काय घडले आहे, याची शहनीशा आखाडा परिषद गोपनीय पद्धतीने करील. बडा उदासीन आखाड्याचे महंत रघुमुनी यांच्या अध्यक्षतेखाली त्याचे व्यवस्थापन लवकरच देण्यात येईल, असे त्यांनी म्हटले.

हिंदू महासभेचे अध्यक्ष चक्रपाणी महाराज या विषयावर चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी आयोध्या येथील श्रीराम मंदिर हे कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान आहे. त्याच्या उभारणीत कोट्यावधी भाविकांनी आणि नागरिकांनी योगदान दिले आहे. त्यातून मोठ्या प्रमाणावर देणग्या जमा झाल्या आहेत. त्याविषयी आता गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे म्हटले. 

भाविकांच्या श्रद्धेचा यानिमित्ताने चक्काचूर झाला आहे. मंदिरातील दान स्वरूपात जमा रक्कम आणि मौल्यवान धातूंचा अपहार धक्कादायक आहे. त्याने साधू समाजाला मोठा धक्का बसला. त्यामुळे अयोध्या येथील श्रीराम मंदिराचे व्यवस्थापन आखाडा परिषदेला दिले पाहिजे, अशी मागणी केली.

अयोध्येतील राम मंदिरात मोठ्या प्रमाणावर दान स्वरूपातील रकमेचा अपहार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात उत्तर प्रदेश सरकारने एसआयटीची स्थापना केली होती. त्यानंतर पोलिसात गुन्हा दाखल होऊन आठ कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. 

या घटनेने देशभरात खळबळ उडाली आहे. विरोधकांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. काँग्रेसचे उत्तर प्रदेश प्रमुख राय यांनी काल अयोध्येत मंदिरात जाऊन दर्शन घेतले.

त्यावरून योगी सरकार आणि काँग्रेसमध्ये चांगलाच वाद पेटला होता. आता या वादात आखाडा परिषदेच्या साधूंनी उडी घेतली आहे. त्यामुळे अयोध्येतील मंदिरात झालेली चोरी हा मंदिर व्यवस्थापनासह केंद्र सरकारसाठी अडचणीचा विषय ठरण्याची चिन्हे आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT