Rohit Pawar alleges Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

BJP Blackmail Allegation : रोहित पवारांचा मोठा बॉम्ब: भाजप सरकारमध्ये ‘भोंदू राज’? अशोक खरात, ब्लॅकमेलिंग आणि 2000 कोटींचा धक्का!

Rohit Pawar alleges BJP government used videos involving politicians and officials linked to Ashok Kharat for blackmailing in Nashik : भोंदूबाबा अशोक खरात याच्याबरोबर असलेल्या राजकीय आणि अधिकाऱ्यांच्या व्हिडिओवरून आमदार रोहित पवार यांचा भाजप सरकारला टोला लगावला आहे.

Pradeep Pendhare

BJP controversy Maharashtra : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्या भोंदूगिरीची व्याप्ती संपूर्ण महाराष्ट्रात पसरली आहे. राजकीय नेते, प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांपर्यंत खरातचं नेटवर्क दिसते. शेकडो महिला खरातच्या शोषणाच्या बळी ठरल्या आहेत. त्यांचे व्हिडिओ समोर आले आहेत.

राजकीय नेते, प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांचे देखील व्हिडिओ होते. ते समोर आले नाहीत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला आहे.

रोहित पवार म्हणाले, "भाजप (BJP) सरकारमध्ये भोंदूंना ताकद मिळली. भोंदू अशोक खरात याच्याकडे 10 वर्षांपूर्वी काहीच नव्हते. आता त्याची संपत्ती दोन हजार करोडाची झाली आहे. सत्तेतल्या लोकांचा पाठिंबा असल्याशिवाय हे होत नाही. सामान्य महिलांचे व्हिडिओ बाहेर आले, पण नेत्यांचे पूजा करतानाचे व्हिडिओ बाहेर आले नाहीत."

अशोक खरात (Ashok Kharat) याच्याबरोबर नेत्यांचे अन् प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या पूजेचे फोटो अन् व्हिडिओ कुठे गेले, असा प्रश्न करताना रोहित पवार यांनी, अशोक खरात याचे अधिकाऱ्यांचे आणि नेत्यांचे व्हिडिओ अन् फोटो होते, त्या व्हिडिओचा वापर ब्लॅकमेलिंगसाठी केला गेला. राजकीय तडजोडीसाठी मोठ्या नेत्यांना अभय दिले गेले. हे सगळं गलिच्छ राजकारण आहे, असा गंभीर आरोप केला.

वारकरी संप्रदायतील धर्मांध आणि प्रतिगामी लोकांच्या घुसखोरीवरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. यावरून सत्ताधारी भाजप, शरद पवार राष्ट्रवादीविरोधात आक्रमक झाली आहे. यातच शरद पवार राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी, घुसखोर 20 जणांची यादी जाहीर केली आहे. विकास लवांडे यांच्याविरोधत भाजप नेते, पदाधिकारी यांनी कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.

रोहित पवार यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, "संतांनी आपल्याला समता बंधुभावाची शिकवण दिली. ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज यांना मनुवादी विचारसरणीच्या लोकांनी त्रास दिला. ज्या मनुवादी विचारांनी संतांना सोडले नाही, तो आपल्यासारख्या सामान्य लोकांना कसे सोडणार? हा संघर्ष संतांचे विचारविरुद्ध मनुवाद, असा आहे. मनुवाद पुरस्कृत काही लोक वारकरी संप्रदायात घुसले आहेत. वारकरी संप्रदायात धारकरी घुसवण्याचे काम सुरू. नेत्यांपेक्षा वारकरी संप्रदायातील सामान्य लोक मनुवादाला बाहेर काढू शकतात."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT