Sunil Kedar & Angry BJP followers Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

BJP Politics: भाजप असंतुष्टांचा राग शमेना; भाजप शहर अध्यक्षांना घेराव घालीत घोषणाबाजी अन् गाजर दिले भेट!

Nashik BJP NMC election candidacy controversy, Report to Girish Mahajan & Devendra Fadnavis-नाशिक रोड परिसरात निष्ठावंतांना डावलून आयाराम, गयाराम यांना भाजपने उमेदवारी दिल्याचा आरोप, निष्ठावंतांनी व्यक्त केला संताप

Sampat Devgire

Nashik BJP News: भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिलेल्यांना एबी फॉर्मचा घोटाळा नडला. दुसरीकडे निष्ठावंतांना उमेदवारी देताना डावलले. त्यामुळे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दुहेरी संतापाला सामोरे जावे लागत आहे.

नाशिक महापालिका निवडणुकीत उमेदवारी देताना भाजपच्या निष्ठावंतांकडे दुर्लक्ष झाले. यासंदर्भात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. मंत्री महाजन यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांशी याबाबत संपर्क केला.

उमेदवारी देताना एका प्रभागात असंख्य इच्छुकांनी भाजपकडे दावा केला होता. उमेदवारी जाहीर झाल्यावर अपेक्षेप्रमाणे नाराजीचा सूर उमटला. उमेदवारी न मिळाल्याने अनेकांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडे संताप व्यक्त केला आहे. गेले दोन दिवस पक्षाचे पदाधिकारी आणि नाराज कार्यकर्त्यांचा रोष वाढत आहे. ही नाराजी अद्यापही कमी झालेली नाही. ते पडसाद आज शहरात विविध ठिकाणी उमटले.

मखमलाबाद, पंचवटी तसेच अन्य भागात भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शहराध्यक्ष व पदाधिकाऱ्यांकडे संताप व्यक्त केला. अनेकांनी पदाधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्यामुळे शहरात हा चर्चेचा विषय बनला आहे. माघारीचा उद्या शेवटचा दिवस असल्याने पदाधिकाऱ्यांची ही धावपळ सुरू आहे.

नाशिक रोड भागात निष्ठावंत कार्यकर्ते आणि पदाधिकारी संतापले आहेत. सकाळी असंख्य कार्यकर्त्यांनी विभागीय अध्यक्ष शांताराम घंटे यांना याबाबत सुनावले. ही नाराजी वरिष्ठांना कळविण्यासाठी शहर अध्यक्ष सुनील केदार यांना नाशिक रोडला बोलविण्यात आले होते.

शहर अध्यक्ष सुनील केदार नाशिक रोडच्या भाजप कार्यालयात पोहोचले असता त्यांना नाराज कार्यकर्त्यांच्या संतापाचा सामना करावा लागला. त्यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. काही उत्साही कार्यकर्त्यांनी शहराध्यक्षांना गाजर भेट दिली. त्यामुळे तो चर्चेचा विषय बनला.

पक्षाच्या कामासाठी आणि उपक्रमांसाठी निष्ठावंत कार्यकर्ते हक्काचे समजले जातात. पक्षाचे कार्यकर्ते तोशिश सहन करून पक्षाचे काम करतात. निवडणुकीत उमेदवारी देताना त्यांचा विसर का पडतो, असा सवाल युवा कार्यकर्ते ऋषिकेश नारद यांनी व्यक्त केला.

यावेळी भावना नारद, रणजीत नगरकर, मंगेश रोझेकर (प्रभाग २१), माजी नगरसेवक अंबादास पगारे, सुनील आडके (प्रभाग २०), पंडित आवारे, नवनाथ ढगे, रूपक चव्हाणके, अनिल घोलप (प्रभाग १९), मंदा फड, सचिन हांडगे (प्रभाग १८), अशोक सातभाई (प्रभाग १७), सीमा डावखर, ज्योती चव्हाणके आदिसह विविध कार्यकर्त्यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.

नाराज कार्यकर्त्यांच्या भावना पदाधिकाऱ्यांनी समजून घेतल्या आहेत. प्रदेश कार्यालय तसेच मुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे अहवाल पाठविण्यात येईल. नाराज कार्यकर्त्यांना आगामी काळात न्याय देण्यात येईल असे, विभागीय अध्यक्ष घंटे यांनी सांगितले.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT