Nashik NMC Election: डिजिटल स्वाक्षरीवरून ठाकरेंच्या शिवसेनेचा भाजपवर हल्ला; भाजपला पराभव दिसू लागला?

Nashik NMC Election BJP Shiv Sena Uddhav Thackeray Politics Shiv Sena on BJP-शिवसेना उध्दव ठाकरेंच्या उमेदवारांचे अर्ज बाद करण्याची मागणी भाजप शहराध्यक्षांनी केल्याने वाद चिघळला!
Sunil Kedar & Vasant Gite
Sunil Kedar & Vasant GiteSarkarnama
Published on
Updated on

Shivsena BJP News: महापालिका निवडणुकीत भाजप शहराध्यक्षांनी काल मोठा डाव खेळला. भाजपच्या या खेळीने शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची काही काळ झोप उडाली होती. हा वाद आता अधिक टोकाला जाण्याची शक्यता आहे.

शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष भाजपला थेट आव्हान देत आला आहे. महापालिका निवडणुकीत या दोन्ही पक्षांतील राजकारण अधिक टोकदार झाले आहे. याची प्रचिती महापालिका निवडणुकीच्या अर्ज छाननीच्या दिवशी आली.

भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या सर्व उमेदवारांचे अर्ज बाद करण्याचा अर्ज दिला होता. शिवसेनेच्या एबी फॉर्मवर डिजिटल स्वाक्षरी असल्याचा मुद्दा त्यांनी पुढे केला होता. भाजपच्या या खेळीने शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेतेही खडबडून जागे झाले होते.

Sunil Kedar & Vasant Gite
AB form Controversy: वादाची ठिणगी; सुधाकर बडगुजर यांना संधी हुकलेल्या भाजप नेत्यानेच दिले आव्हान, म्हणाले...

भाजप सत्ताधारी पक्ष असल्याने प्रशासनाला हाताशी धरून शिवसेनेची कोंडी करण्याचा त्यांचा प्रयत्न असावा अशी भीती शिवसेना नेत्यांमध्ये पसरली. यासंदर्भात पक्षाच्या उमेदवारांनी लगेचच एकाच वेळी विविध नेत्यांशी संपर्क केला. त्यामुळे शिवसेना ठाकरे पक्षाच्या नेत्यांचीही चांगलीच धावपळ झाली.

Sunil Kedar & Vasant Gite
Shiv Sena MNS News: उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेच्या खेळीने मनसेचा गेम? नऊ प्रभागात मनसेविरोधात शिवसेनेचे उमेदवार!

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी भाजपचा हा आक्षेप फेटाळला. त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या उमेदवारांचा जीव भांड्यात पडला. मात्र यावरून शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे.

शिवसेनेचे माजी आमदार वसंत गीते यांनी याबाबत भाजपला खडे बोल सुनावले. भाजपने शिवसेनेचा एवढा धसका घेतला आहे की त्यांची झोप उडाली आहे. त्यामुळेच प्रशासनाला हाताशी धरून ते कटकारस्थान करण्यात व्यस्त आहेत, असा हल्ला गिते यांनी केला.

भाजपने सुरुवातीला शिवसेनेच्या नेत्यांना अनितीने फोडले. पक्षाचे चिन्ह चोरले. आमच्या उमेदवारांच्या विरोधात खोट्या तक्रारी करण्याचे काम आता सुरू आहे. यावरून हा पक्ष आत्मविश्वास हरवलेला पक्ष असल्याचे दिसून आले.

भाजपने मोठ्या प्रमाणावर शिवसेना आणि अन्य पक्षाच्या नेत्यांना आपल्या पक्षात प्रवेश दिला आहे. त्यामुळे हा पक्ष आपली ओळख हरवून बसला आहे. सामान्य मतदारांमध्ये त्या विरोधात प्रचंड संताप आहे.

पक्षाचे कार्यकर्ते आणि नेत्यांमधील नाराजी भाजपला अडचणीत अनिल. भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाचा संताप मतदार निवडणुकीतून व्यक्त करतील. राहिलेले काम भाजपतील निष्ठावंत कार्यकर्ते आणि नेतेच करतील. भाजपच्या पराभवासाठी पक्षातील नाराज नेते कामाला लागले आहेत.

शिवसेनेवर खोटे आरोप आणि कारस्थाने करणे ऐवजी भाजपने थेट मैदानात येऊन लढावे, असे आव्हान माजी आमदार गीते यांनी दिले. डिजिटल स्वाक्षरीचा तांत्रिक मुद्दा भाजपने उचलला. हा मुद्दा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या नेत्यांना चांगलाच जिव्हारी लागल्याचे दिसून आले.

---------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com