Sudhakar Badgujar News: महापालिका महासभेत वाद हा नवा नाही. बऱ्याचदा नगरसेवक सोयीनुसार लाभ हानी याचा विचार करून टीका करीत असतात. आजच्या पहिल्याच महासभेत त्याचा प्रत्यय आला. गल्लीतल्या विरोधकांनी एकमेकांविरोधात बाह्या सरसावल्या.
महापौर हिमगौरी आडके यांच्या कारकिर्दीतील पहिली महासभा आज झाली. या महासभेत सामान्य कामकाज आणि विषय पत्रिका होती. मात्र या महासभेतही काही भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या नगरसेवकांनी परस्परांचे हिशेब चुकते करण्याचा प्रयत्न केला
महासभा सुरू होताच महापौरांनी भाजपचे सुधाकर बडगुजर यांना बोलण्याची परवानगी दिली. विषय पत्रिकेच्या वाचनासह नियमित चर्चा अपेक्षित होती. मात्र बडगुजर यांनी महापालिका कर्मचाऱ्यांचे प्रश्न मांडण्यास सुरुवात केली.
भाजपच्या बडगुजर यांनी महापालिका कर्मचाऱ्यांचा विषय उपस्थित करतात काही नगरसेवकांनी आक्षेप घेतला. महासभेच्या संकेतांनुसार नियमानुसार प्रश्नोत्तरांचा विषय पहिलीच सभा असल्याने अपेक्षित नव्हता. असे असतानाही बडगुजर यांना विषय उपस्थित करण्याची परवानगी का देण्यात आली? असा आक्षेप काही नगरसेवकांनी घेतला.
यावेळी सत्ताधारी नगरसेवक बडगुजर यांचे प्रभागातील राजकीय विरोधक व अपक्ष मुकेश शहाणे चांगलेच संतप्त झाले. त्यांनी आपले असून सोडून थेट महापौर्यान पुढे जात तावातवाने बडगुजर यांच्या विषयी संताप व्यक्त केला. आपण त्यांना परवानगी कशी दिली? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
शहाणे आणि बडगुजर हे गल्लीतील परस्परांचे राजकीय विरोधक आहेत. महापालिका निवडणुकीच्या आधीही त्यांच्यात सातत्याने वादविवाद होत आले आहेत. ऐनवेळी भाजप प्रवेश केलेले बडगुजर यांनी शहाणे यांची उमेदवारी कापली. मात्र बडगुजर यांनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी करीत निवडणूक जिंकली.
गल्लीतील हा वाद महापालिकेच्या पहिल्याच महासभेत देखील पोहोचला. बडगुजर आणि शहाणे यांच्यात विषय पत्रिकेवरून चांगलाच वाद झाला. हा वाद समाज माध्यमांवर व्हायरल करण्यात आला. त्यामुळे तो चर्चेचा विषय ठरला आहे. महापौर हिमगौरी आडके यांनी मात्र हा विषय अतिशय खुबीने हाताळत तो होता तिथेच थांबवला.
------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.