Chhagan Bhujbal : रोहित पवारांच्या 'त्या' विधानावर छगन भुजबळांची फटकेबाजी; 'तिरकस' प्रश्नाने राष्ट्रवादीतील संघर्ष पेटणार?

NCP internal conflict: रोहित पवारांच्या वक्तव्यावर छगन भुजबळांनी दिलेल्या तिखट प्रतिक्रियेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा संघर्षाची चिन्हे.
Chhagan Bhujbal reaction to Rohit Pawar statement
Chhagan Bhujbal reaction to Rohit Pawar statementSarkarnama
Published on
Updated on

Bhujbal slams Rohit Pawar over remarks: दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा वाद रोज नवी वळणे घेत आहे. यावर मंत्री छगन भुजबळ यांनीही नवे वक्तव्य केले आहे. विलीनीकरणाला अप्रत्यक्षरीत्या त्यांनी विरोध दर्शवत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी विलीनीकरणाबाबत वक्तव्य केले होते. वक्तव्यावर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी टीका केली आहे. विलीनीकरणाबाबत कोणतीही चर्चा आपल्याला माहित नाही असे ते म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण हा मुद्दा सध्या दोन्ही गटाच्या नेत्यांमध्ये वादाचा विषय बनला आहे. खासदार डॉ अमोल कोल्हे हे विलीनीकरणानंतर प्रदेशाध्यक्ष होणार होते, असे वक्तव्य रोहित पवार यांनी केले होते. त्यावर छगन भुजबळ यांनी रोहित पवार यांना टोला लगावला.

Chhagan Bhujbal reaction to Rohit Pawar statement
यूपीएससीची 'फॅक्टरी'! या 2 जिल्ह्यांनी देशाला दिले सर्वाधिक IAS; इथल्या अभ्यासाची पद्धत वाचून तुम्हीही थक्क व्हाल!

दिवंगत नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे विलेनीकरण याबाबत निर्णय घेतला होता. विलीनीकरणानंतर काही महत्त्वाचे बदल ते करणार होते. त्यामध्ये प्रदेशाध्यक्ष पदासाठी खासदार डॉ कोल्हे यांच्या नावाचा प्रस्ताव होता. विविध बैठकांना त्यामुळेच डॉ कोल्हे उपस्थित होते, असा दावा रोहित पवार यांनी केला होता.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत दिवंगत नेते अजित पवार यांनी बहुतांशी निर्णय घेतले होते, असे रोहित पवार म्हणतात. मात्र आम्हाला याबाबत कोणतीही माहिती नाही. अजित दादांनी देखील काहीही सांगितले नव्हते, असे भुजबळ म्हणाले. दोन्ही पक्षांचे विलीनीकरण होणार असते तर आम्हाला त्याची माहिती नक्कीच कळली असती. मात्र तसे काहीही झाल्याचे दिसत नाही. विलीनीकरण होण्याआधीच रोहित पवार यांनी बहुतांशी निर्णय आणि पदांचे वाटप केले की काय? असा प्रश्न त्यांनी केला.

Chhagan Bhujbal reaction to Rohit Pawar statement
Kolhapur News : कोल्हापूर पालिकेत सत्तेसाठी महायुतीची रस्सीखेच; 'महिला राज' आणि 'परिवहन'च्या चाकावरून समीकरण सुटेना

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरण आधीच कोणकोणत्या पदावर नियुक्त होईल? हे देखील रोहित पवार यांनी ठरवले होते. प्रदेश आणि राष्ट्रीय अध्यक्ष कोण? हे ठरवले. असे असेल तर उपमुख्यमंत्री कोणाला करायचे हेही ठरवले होते का? असा टोमणा भुजबळ यांनी लगावला. भुजबळ यांनी रोहित पवार यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या आमच्या पक्षाच्या नेत्या आहेत. पक्षाच्या भूमिकेबाबत त्याच मुख्य निर्णय घेतील, असेही भुजबळ म्हणाले.

आमदार रोहित पवार यांनी विलीनीकरणासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत सातत्याने विविध विधाने केली आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या नेत्यांमध्ये यावरून मतभिन्नता वारंवार पुढे आली आहे. मंत्री भुजबळ यांचा देखील या निर्णयाला विरोध असल्याचे आता अधोरेखित झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com