Lumbaram Choudhary Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Burning Car: मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण थरार! खासदारांची धावती रेंज रोव्हर पेटली; भाजपच्या चौधरींसह कुटुंब थोडक्यात बचावलं

Nashik Burning Car BJP MP Lumbaram Chaudhary Rajasthan narrowly escapes-मुंबई महामार्गावर चालत्या गाडीने पेट घेतल्याने भाजप खासदार आणि कुटुंबीय थोडक्यात बचावले

Sampat Devgire

Lumbaram Chaudhary: मुंबई आग्रा महामार्गावर शनिवारी भरणी कारचा थरार पाहायला मिळाला. हाय प्रोफाईल भाजप नेत्याची गाडी यामध्ये जळून खाक झाली. खासदार चपळाईने बाहेर पडल्याने थोडक्यात बचावले.  

माउंट आबू (राजस्थान) येथील भाजपचे खासदार लुंबाराम चौधरी थोडक्यात बचावले आहेत. खासदार चौधरी कुटुंबीयांसह देवदर्शन आला जात होते. यावेळी नाशिकच्या मुंबई आग्रा महामार्गावर अपघाताचा हा थरार घडला.

नाशिक- मुंबई आग्रा महामार्गावरील गोंदे औद्योगिक वसाहती जवळ हा प्रकार घडला. खासदार कुटुंबीयांसह या गाडीतून प्रवास करीत होते. गाडीतील सर्व जण आश्चर्यकारकरीत्या बचावले आहेत. 

खासदार चौधरी आपल्या रेंज रोव्हर गाडीतून त्र्यंबकेश्वर कडे दर्शनाला जात होते. वाशिम येथून त्रंबकेश्वरला ते निघाले होते. त्यांची गाडी शहापूर येथील अनिल जाधव हे चालवीत होते. 

मुंबई महामार्गावर गोंदे येथे चालकाला गाडीत जळाल्याचा वास आला. त्याने सावधगिरी म्हणून तपास करण्याचा प्रयत्न केला. मात्र फारसे काही लक्षात न आल्याने त्याने तातडीने गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली. यावेळी गाडीचे बोनट जळत असल्याचे त्याच्या लक्षात आले. 

चालक जाधव याने तातडीने गाडीतील खासदार चौधरी आणि इतरांना सावध केले. हे सर्वजण क्षणाचाही विलंब न लावता तातडीने गाडीतून बाहेर पडले. त्यानंतर अवघ्या काही मिनिटात गाडीचा कोळसा झाला. अग्निशामक दलाने प्रयत्न करूनही गाडी आगीच्या भक्षस्थानी पडली. 

अत्यंत चपळाईने आणि वाहन चालकाच्या दक्षतेमुळे खासदार व त्यांचे कुटुंबे गाडीतून बाहेर पडले होते. त्यांच्या या चपळाईमुळेच ते बचावले. अन्यथा त्यांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला असता. यासंदर्भात वाढीवरे पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. 

या घटनेनंतर खासदार चौधरी यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र खासदार चौधरी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. गाडी सोडून चौधरी कुटुंबीय तातडीने राजस्थानला रवाना झाल्याचे सांगण्यात आले. 

गोंदे परिसरातील नागरिकांनी हा बर्निंग कारचा थरार पाहिला. अवघ्या काही मिनिटात ही अत्यंत उच्च तांत्रिक क्षमतेची महागडी गाडी जळून खाक झाली. त्यातील प्रवासी वाचले यावर प्रत्यक्षदर्शींचा विश्वास बसत नव्हता. भाजप खासदाराची गाडी जळाली मात्र खासदार गाडीतील सर्व वाचल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT