Chhagan Bhujbal Politics: राष्ट्रवादीत पुन्हा भूकंप? `विलीनीकरण`वर भुजबळांचा बंडखोर सूर? अजितदारांच्या गोटातील नाशिकच्या आमदारांमध्ये कुजबुज वाढली!

Nashik NCP Ajit Pawar party merger Chhagan Bhujbal MLA becomes cautious-सर्वाधिक सात आमदार असलेल्या नाशिकच्या आमदारांची भूमिका वेगळीच असल्याची चर्चा
Chhagan-Bhujbal
Chhagan-BhujbalSarkarnama
Published on
Updated on

NCP Merger News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पश्चात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावरून चर्चा रंगली आहे. यामध्ये अजित पवार पक्षातील काही नेत्यांनी वेगळी भूमिका घेतली. त्यामुळे पक्षांतर्गत राजकारण रंगले आहे. 

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणावर आपली भूमिका मांडली. अप्रत्यक्षरीत्या त्यांनी हा विषयच फेटाळला आहे. विलीनीकरणाची एवढी घाई का? असा प्रश्न त्यांनी केला. 

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातील प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ आणि माजी मंत्री धनंजय मुंडे आदी नेत्यांचा दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला विरोध लपून राहिलेला नाही. राजकीय सोय आणि गैरसोय यातून ही भूमिका पुढे आली आहे. 

Chhagan-Bhujbal
Tipu Sultan Controversy : टिपू सुलतान प्रतिमेचा वाद; तिकडे मुख्यमंत्री-सपकाळ भिडले अन् इकडे प्रतिमा काढली!

मंत्री भुजबळ यांनी, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नुकताच उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला आहे. त्या आमच्या नव्या कॅप्टन आहेत. पक्षाची सूत्रे त्यांच्या हाती सुपूर्त करायचे आहेत. या स्थितीत त्यांना स्थिरस्थावर होऊ द्यावे, अशी भूमिका घेतली. 

Chhagan-Bhujbal
Eknath Khadse Politics: अवैध मुरूमाचा काळा खेळ? खडसेंचा थेट हल्लाबोल; भाजप आमदार-पोलिसांवर संगनमताचा आरोप

मंत्री भुजबळ यांसह अन्य नेत्यांनी उघडपणे विलीनीकरणाला केलेला विरोध हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांची कोंडी करणारा आहे. नाशिक मध्ये पक्षाचे सर्वाधिक सात आमदार आहेत. या आमदारांचाही कल विलीनीकरणाकडे दिसत होता.  

मंत्री भुजबळ यांनी यावर स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्यानंतर हे आमदार देखील सावध झाले आहेत. पक्षाचे नेतृत्व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवावे अशी मागणी या आमदारांनी यापूर्वीच केली होती. माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांनीही त्यावर भूमिका मांडली होती.

आता मंत्री भुजबळ यांनी विलीनीकरणाला उघडपणे विरोध केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आमदार देखील सावध झाले आहेत. या आमदारांची भूमिका काय? यावर आमदारांनी थेट प्रतिक्रिया देण्याचे टाळले. त्यामुळे मंत्री आणि आमदार यांच्या भूमिकेत अंतर तर नाही ना? अशी चर्चा सुरू झाली आहे.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com