Nashik Collector Ayush Prasad Visits Lasalgaon Onion Market Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Lasalgaon APMC : नाशिक जिल्हाधिकाऱ्यांची आशिया खंडातील सर्वात मोठ्या कांदा बाजारपेठला भेट ; शेतकऱ्यांमध्ये जनजागृतीचे नाफेडला निर्देश

Nashik Collector Ayush Prasad Visits Lasalgaon Onion Market : नाशिक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी लासलगाव बाजार समितीला भेट दिली. नाफेडकडून सुरु असलेल्या कांदा खरेदीचा आढावा घेत त्यांनी नाफेडला काही महत्वपूर्ण सूचना केल्या.

Ganesh Sonawane

Lasalgaon Onion Market : नाशिक जिल्ह्यात नाफेड (NAFED) आणि एनसीसीएफ (NCCF) यांच्या माध्यमातून कांदा खरेदी सुरू झालेली आहे. कांदा खरेदीचे प्रमाण वाढविण्यासाठी नाफेडने शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी. त्यासाठी लासलगाव बाजार समितीच्या आवारात दर्शनी भागात जनजागृतीपर फलक लावावेत. असे निर्देश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले.

नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी काल सायंकाळी आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट दिली. नाफेडकडून सुरू असलेल्या कांदा खरेदीचा आढावा त्यांनी घेतला. नाफेडतर्फे होणाऱ्या कांदा खरेदीची शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी, अशा सूचना त्यांनी केल्या.

यावेळी अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण (मालेगाव), निफाडचे उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, लासलगाव बाजार समितीच्या संचालिका सुवर्णा जगताप, व्यापारी संचालक प्रवीण कदम, बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले की, नाफेडतर्फे कांदा खरेदी सुरू आहे. आतापर्यंत वेळोवेळी दरवाढ झाली आहे. त्यामुळे नाफेडने दोन कर्मचाऱ्यांची नियुक्त करून शेतकऱ्यांमध्ये यासंदर्भात जनजागृती करावी. तसेच शेतकऱ्यांना कांद्याचे दर, नियमावली याविषयी माहिती द्यावी.

सध्या कांद्याला प्रति क्विंटल १८७५ रुपये इतका भाव मिळत आहे. मालेगाव, पिंपळगाव बसवंत यासह लालसगाव बाजार समितीमध्ये कांदा खरेदीचे प्रमाण वाढवावे. शेतकऱ्यांचा कांदा खरेदीसाठी लिलावानंतर किमान दोन नाफेडच्या कर्मचाऱ्यांनी थांबावे. तसेच सरसकट कांद्याची खरेदी करावी. त्यासाठी बाजार समितीने सनियंत्रण करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री प्रसाद यांनी केल्या.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नाफेडचे शाखा व्यवस्थापक अनिकेत मदान, एनसीसीएफचे व्यवस्थापक श्री. हर्ष यांच्या समवेत कांदा खरेदीचे प्रमाण वाढविण्यासंदर्भात उपाययोजनांवर चर्चा केली. यावेळी जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी कांद्याची आवक, आतापर्यंत झालेली खरेदी, दर याविषयीही माहिती घेतली. यावेळी बाजार समितीचे सहाय्यक सचिव प्रकाश कुमावत, लासलगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक पाटील आदी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT