Rahul Dive Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Congress Politics: ज्याने काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या त्यानेच दुसऱ्या दिवशी काँग्रेस सोडली, आता उमेदवारीसाठी भाजपच्या वाटेवर?

Nashik Congress Balasaheb Thorat's close aide Rahul Dive resigns, possibility of joining BJP-माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या निकटवर्तीय नेत्यानेच दिला काँग्रेसचा राजीनामा दिल्याने पक्षाला धक्का.

Sampat Devgire

Rahul Dive News: माजी नगरसेवक आणि प्रदेश सरचिटणीस राहुल दिवे यांनी आज काँग्रेसचा राजीनामा दिला. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा राजीनामा चर्चेचा विषय आहे. काँग्रेस पक्षाच्या जवळपास सर्वप्रमुख माजी नगरसेवकांनी पक्ष सोडला आहे.

माजी नगरसेवक राहुल दिवे यांनी आज काँग्रेस पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. श्री दिवे हे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे निकटवर्तीय असल्याचा दावा करतात. त्यामुळे हा राजीनामा चर्चेचा विषय बनला आहे.

माजी नगरसेवक दिवे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर करणार असल्याची चर्चा आहे. त्यांच्या समवेत निवडून आलेल्या माजी नगरसेविका अशा तडवी यादेखील त्यांचे अनुकरण करण्याची शक्यता आहे. गेले काही दिवस या दोन्ही माजी नगरसेवकांची भाजप प्रवेशाची चर्चा होती.

मावळत्या महापालिकेत काँग्रेसचे सहा नगरसेवक होते. याशिवाय (कै) विमल पाटील या सहयोगी सदस्या होत्या. काँग्रेसशी संबंधीत मात्र अपक्ष नगरसेवक असलेल्या गुरमीत बग्गा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सहयोगी सदस्यत्व स्विकारले होते. (कै) श्रीमती पाटील यांचे चिरंजीव नरेश पाटील आणि श्री. बग्गा यांनी यापूर्वीच भाजप पक्षात प्रवेश केला आहे.

काँग्रेसच्या जॉय कांबळे यांनी शिवसेना शिंदे गटात तर डॉ हेमलता पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षात सध्या केवळ शाहू खैरे आणि वत्सला खैरे हे दोघेच माजी नगरसेवक राहिले आहेत.

दोन दिवसांपूर्वी श्रीदेवी यांसह माजी नगरसेवक राहुल दिवे आणि वत्सला खैरे यांनी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांचा मुलाखती घेतल्या होत्या. त्यानंतर लगेचच श्री दिवे यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्यासोबत आशा तडवी या देखील पक्ष सोडण्याची शक्यता आहे.

यानिमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या प्रभाग क्रमांक १६ मधील विद्यमान नगरसेवकांवर उमेदवारीचे संकट कोसळण्याची शक्यता आहे. नाशिक मध्य मतदार संघाच्या आमदार देवयानी फरांदे यांची निवडणूक प्रमुख पदी नियुक्ती झाली होती. त्यानंतर लगेचच या घडामोडी घडल्या.

अन्य एक माजी नगरसेवक शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे येत्या दोन-तीन दिवसात आणखी घडामोडी घडणार आहेत. आणखी कोणत्या काँग्रेस नेत्याचे पक्षांतर होते याची उत्सुकता आहे.

.....

मी आज काँग्रेस पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. लवकरच कार्यकर्ते व समर्थकांशी चर्चा करून पुढील निर्णय घेईल. कोणत्या पक्षात जायचे हे निश्चित नाही. मात्र महापालिकेची निवडणूक लढवणार आहे.

-राहुल दिवे, माजी नगरसेवक.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT