Harshvardhan Sapkal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Congress Politics: ‘हात’ रिकामा, बंडखोर भारी! काँग्रेसमधून बाहेर पडले, पुढे विजयी नगरसेक ठरले!

Nashik Congress Harshvardhan Sapkal NMC elections, seven people became corporators again-काँग्रेसचा वारसा अशी प्रतिमा असलेल्या माजी नगरसेवकांनीच सोडला पक्षाचा हात, पक्षापुढे आता नव्या अडचणी

Sampat Devgire

Nashik Congress News: महापालिका निवडणुकीत काँग्रेस सिंगल डिजिटवर आली. जे निवडून आले तो त्यांचा व्यक्तिगत करिष्मा म्हणावा लागेल. त्यामुळे आगामी काळात काँग्रेस अस्तित्वासाठी झगडण्याची चिन्हे आहे.

काँग्रेस पक्ष आणि वाद हे समीकरण आहे. या पक्षाचे शहराध्यक्ष सबंध प्रचारात शोधूनही सापडले नाही. पक्षाचा एकही नेता नाशिकला फिरकला नाही. एकंदरच उमेदवारांना धीर वाटावा असे काहीच या निवडणुकीत घडले नाही.

काँग्रेस पक्षाने महापालिका निवडणुकीच्या आधीच पराभव स्वीकारला अशी स्थिती होती. या मानसिकतेतून पक्षाचे पदाधिकारी शेवटपर्यंत बाहेर पडली नाही. जे पक्ष सोडणार आहेत त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न झाला नाही. नाशिकच्या शहराध्यक्षांची तेवढी कुवतच नसल्याने पक्ष गाळात गेला अशी प्रतिक्रिया संतप्त कार्यकर्त्यांची आहे.

काँग्रेस पक्षाचे दोन डिजिट नगरसेवक २०१७ च्या निवडणुकीत शरद आहेर या बाहेरच्या व्यक्तीला अध्यक्ष केल्याने सिंगल डिजिट झाले. सध्या असलेले सहा नगरसेवक तीनवर आले. यापूर्वीचे सर्व सहा नगरसेवक पक्ष सोडून गेले आणि भाजप व शिवसेना शिंदे पक्षात पुन्हा नगरसेवक झाले.

उमेदवारीचा वाद रंगल्याने सक्रिय कार्यकर्ते पक्षापासून दूर गेले आहेत. हनीफ बशीर, सुरेश मारू यांसह अनेक नेते आता पक्षात नाही. त्यामुळे किमान आंदोलनात दिसणारे चेहरे आता आणायचे कुठून हा मोठा प्रश्न या पक्षापुढे आहे. या हाराकिरितून बोध घेऊन पक्ष काही बदल करील का? या प्रश्नाचे उत्तर देखील या पक्षाकडे नाही. नाशिकचा कारभार पाहणारे टिळक भवन मधील सरचिटणीस याला प्रामुख्याने कारणीभूत असल्याचे बोलले जाते.

भाजपने उमेदवारी दिलेले शाहू खैरे (प्रभाग १३) हे प्रदीर्घ काळ काँग्रेसचे नगरसेवक होते. पक्षाने त्यांना स्थायी समिती सभापती यांसह अनेक पदे दिली. काँग्रेस विरोधी पक्ष असतानाही सर्व सत्ता त्यांच्याकडे केंद्रित असे. नाशिक महापालिकेचे दुसरे महापौर (कै) पंडितराव खैरे हे त्यांच्याच कुटुंबीयात मोडतात. काँग्रेसचा वारसा असलेल्या खैरे यांनी यंदा वारे ओळखून पक्षांतर केले.

जॉय उर्फ समीर कांबळे (प्रभाग १२) हे देखील पूर्वाश्रमीचे काँग्रेस नेते उत्तमराव कांबळे यांचे चिरंजीव आहेत. मोठा जनसंपर्क आणि नम्रत स्वभाव हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. काँग्रेस पक्षातील नेतृत्वाचा वाद आणि विसंवाद ओळखून त्यांनी शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश केला.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या डॉ हेमलता पाटील (प्रभाग १२) मधून विजयी झाल्या. विधानसभेत उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी सुरुवातीला शिवसेना शिंदे पक्षात तर नंतर यू टर्न घेत राष्ट्रवादी काँग्रेस जवळ केली होती. काँग्रेस पक्षाने त्यांना पाच वेळा महापालिका निवडणुकीत उमेदवारी दिली होती.

पूर्वाश्रमीचे काँग्रेस नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सहयोगी सदस्य गुरमीतसिंग बग्गा (प्रभाग ५), माजी नगरसेविका विमलताई पाटील यांच्या स्नुषा नीलम पाटील (प्रभाग ५) हे भाजपचे विजयी उमेदवार विधानसभा निवडणुकी पासूनच ते भाजप आमदार राहुल ढिकले यांच्या संपर्कात होती. महापालिका निवडणूक डोळ्यापुढे ठेवून त्यांनी खूप आधीच पक्षापासून फारकत घेतली होती.

प्रभाग सोळा मधून शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे राहुल दिवे आणि आशा तडवी विजयी झाल्या. या दोघांनी निवडणूक प्रक्रिया सुरू असताना अचानक काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. शिंदे पक्षाने या प्रभागात खूप आधी प्रवेश केलेल्या इच्छुकांवर अन्याय करीत सर्व चार एबी फार्म दिवे यांना सुपूर्त केले होते. दिवे यांच्यावर देखील विधानसभा निवडणुकीत आघाडीच्या विरोधात काम केल्याचा आरोप केला जातो.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT