Hemant Godse and anil Jadhav Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Constituency : ...अन् शेवटच्या क्षणी भाजपच्या अनिल जाधवांनी उमेदवारी मागे घेण्यासाठी करायला लावली धावाधाव!

Sampat Devgire

Shivsena Shinde Group News: नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीला बंडखोरी टाळण्यात यश आले. सोमवारी शेवटच्या दिवशी शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपच्या बंडखोरांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नांना यश आले.

नाशिक मतदार संघात शिवसेना ठाकरे गटाचा राजीनामा दिल्यानंतर शिंदे गटात प्रवेश केलेल्या विजय करंजकर यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. करंजकर यांनी अर्ज मागे घेतल्याने महायुतीचे उमेदवार खासदार गोडसे यांना दिलासा मिळाला आहे.

करंजकर यांनी यापूर्वी ठाकरेंनी उमेदवारी नाकारल्याने उमेदवारी कायम ठेवून "लढणार आणि नडणार'"असा इशारा दिला होता. करंजकर आणि खासदार गोडसे हे दोघे देवळाली विधानसभा मतदारसंघातील आहेत. त्यामुळे करंजकर यांच्या उमेदवारीने गोडसे यांना फटका बसला असता. मात्र करंजकर यांनी माघार घेऊन खासदार गोडसे(Hemant Godse) यांना दिलासा दिला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे निवृत्ती अरिंगळे यांनीही अपक्ष उमेदवारी केली होती. नाशिक मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा आहे. या संदर्भात सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी आग्रह केला होता. दोन दिवसापूर्वी अरींगळे त्यांनी देखील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. नाशिक मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत करण्याचा दावा त्यांनी केला होता. या संदर्भात पक्षाचे वरिष्ठ नेते उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांच्याशी त्यांनी चर्चा केली होती. मात्र आज पक्षाच्या नेत्यांनी सूचना केल्याने आरींगळे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह जाऊन उमेदवारी अर्ज मागे घेतला.

भारतीय जनता पक्षाचे अनिल जाधव(Anil Jadhav) यांनी पक्षाने आपल्याला उमेदवारी देण्याचे आश्वासन दिले आहे. असा दावा केला होता. निवडणुकीतून माघार घेणार नसल्याचेही त्यांनी जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर सोमवारी खासदार हेमंत गोडसे यांनी जाधव यांना उमेदवारी मागे घेण्याची विनंती केली. बराच वेळ त्यांची समजूत काढण्यात गेली. त्यामुळे माघार घेण्यासाठी एक मिनिट शिल्लक असताना ते जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले धावपळीत कार्यालयाच्या पायऱ्या चढताना जाधव यांचे काही सहकारी व छायाचित्रकार पाय घसरून पडले. ऐन वेळेवर आल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचा माघारीचा अर्ज स्वीकारण्यास नकार दिला होता. मात्र अन्य अधिकारी आणि उमेदवार खासदार गोडसे यांनी विनंती केल्याने जाधव यांचा माघारीचा अर्ज स्वीकारण्यात आला.

आज विविध उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानंतर नाशिक मतदार संघात 31 उमेदवार राहिले आहेत, यामध्ये विद्यमान खासदार आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे(, महाविकास आघाडीचे माजी आमदार राजाभाऊ वाजे अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज आणि वंचित बहुजन आघाडीचे करण गायकर हे प्रमुख चार उमेदवार स्पर्धेत आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT