Dindori constituency 2024: फडणवीसांची खेळी, हरिश्चंद्र चव्हाणांची माघार; डॉ. भारती पवार यांना दिलासा

BJP EX MP भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी आज आपला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला
Harishchandar Chavan, Dr. Bharati Pawar
Harishchandar Chavan, Dr. Bharati Pawarsarkarnama

Dr. Bharati Pawar News: दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपच्या डॉ. भारती पवार अधिकृत उमेदवार आहेत. मात्र, या मतदारसंघात माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी बंडखोरीचा इशारा दिला होता. आज चव्हाण यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपच्या केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार यांना मोठा दिलासा मिळाला. भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी या मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी जाहीर केली होती. त्यांनी अर्ज दाखल केल्याने भाजपचे नेते आणि उमेदवार डॉ. पवार अस्वस्थ होत्या.

माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी यांनी माघार घ्यावी यासाठी विविधस्तरावरून प्रयत्न सुरू होते. त्याला आज शेवटच्या दिवशी यश आले. त्यामुळे डॉ. पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. माजी खासदार चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी आज अतिशय वेगवान हालचाली झाल्या. भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चव्हाण यांच्याशी संपर्क केला.

आगामी काळात आपला योग्य सन्मान ठेवून राजकीय पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी दिले. तत्पूर्वी भाजपच्या स्थानिक नेत्यांनीही चव्हाण यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी चव्हाण यांच्याशी चर्चा केली. या चर्चेनंतर उपमुख्यमंत्री फडणवीस यांची शिष्टाई सफल झाली. दुपारी चव्हाण यांनी आपल्या उमेदवारी अर्ज मागे घेतला.

Harishchandar Chavan, Dr. Bharati Pawar
Nashik Constituency 2024: विजय करंजकरांसाठी शिंदे गटाच्या पायघड्या...

यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात माजी खासदार चव्हाण म्हणाले, आज समर्थकांची बैठक झाली. त्यात सगळ्यांनी पक्षाकडून योग्य मानसन्मान होत नसल्याने उमेदवारी करण्याचा निर्णय झाला. मतदार संघातील सर्व भागातील कार्यकर्ते यावेळी भेटीसाठी आले होते. बहुतांशी पदाधिकाऱ्यांनी उमेदवारी करावी असा कल व्यक्त केला. मात्र उमेदवार डॉक्टर पवार तसेच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी चर्चा केल्याने उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे, असे सांगितले.

दिंडोरी मतदार संघात आता भाजपच्या डॉ पवार यांची लढत महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे भास्कर भगरे यांच्याशी आहे. येथे वंचित आघाडीने मालती थवील यांना उमेदवारी दिली आहे. अन्य काही अपक्ष उमेदवार आहे. त्यामुळे भाजपच्या डॉ. पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे भगरे यांच्या थेट सामना आहे. त्यामुळे ही निवडणूक अतिशय चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.

Edited By : Umesh Bambare

Harishchandar Chavan, Dr. Bharati Pawar
Dindori Constituency : शरद पवारांना 'गिफ्ट'; भाजपच्या पराभवासाठी जे.पी.गावितांची माघार!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com