Nashik Constituency 2024: विजय करंजकरांसाठी शिंदे गटाच्या पायघड्या...

Vijay Karanjkar News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटात सुरू आहे जोरदार इनकमिंग. या घडामोडींमुळे ऐन लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. यामुळे शिवसेनेच्या ठाकरे गटाला डॅमेज करण्यासाठी प्रयत्न करतील का? आणि त्यात ते किती यशस्वी होतात याची उत्सुकता आहे.
Vijay Karanjkar
Vijay KaranjkarSarkarnama
Published on
Updated on

Vijay Karanjkar News : गेले महिनाभर भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांशी वाटाघाटी करणारे विजय करंजकर यांनी अखेर शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री शिंदे यांनीही त्यांचे स्वागत करीत उपनेते पद बहाल केले आहे. या घडामोडींमुळे ऐन लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) ठाकरे गटाला धक्का बसला आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख विजय करंजकर (Vijay Karanjkar) यांनी अखेर पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. गेले महिनाभर ते भारतीय जनता पक्षाचे नेते आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) तसेच शिवसेना शिंदे गटाच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात होते.

मोठ्या आश्वासनाची अपेक्षा असलेल्या करंजकर यांना फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. या पार्श्वभूमीवर काल त्यांनी आपल्या समर्थकांचा मेळावा घेतला. त्यानंतर झालेल्या जलद घडामोडींमध्ये रात्री त्यांनी अपेक्षेप्रमाणे शिंदे गटात प्रवेश केला.

Vijay Karanjkar
Nashik Politics: ठाकरे गटातील करंजकर नवा डाव टाकणार ; उमेदवारी नाकारल्याने कोणाला नडणार?

विजय करंजकर यांना पक्षाने उत्तर महाराष्ट्रातील जबाबदारी देऊन उपनेते पद दिले आहे. त्यांच्यावर नाशिक जिल्हा संपर्क नेते पदाची देखील जबाबदारी असेल. त्यामुळे करंजकर यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिल्याचे गिफ्ट म्हणून ही पदे त्यांना बहाल करण्यात आली आहेत.

करंजकर ठाकरे गटात जिल्हाप्रमुख होते. या पदावर असताना काही जबाबदाऱ्या यशस्वी न करता आल्याने वरिष्ठ नेते त्यांच्यावर नाराज होते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचे जिल्हाप्रमुख पद काढून घेण्यात आले.

त्यांना लोकसभा संपर्कप्रमुख करण्यात आले होते. यावेळीच त्यांची उमेदवारी होणार नाही, असे संकेत देण्यात आले होते. मात्र, करंजकर यांनी शिवसेना ठाकरे गटाने माजी आमदार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांची उमेदवारी जाहीर झाल्यावर बंडाची भाषा केली होती.

'लढणार आणि पाडणार' अशी घोषणा करंजकर यांनी केली. मात्र, आता लढण्याचा निर्णय मागे घेतल्याचे दिसत आहे. आता ते शिवसेनेच्या ठाकरे गटाला डॅमेज करण्यासाठी प्रयत्न करतील. त्यात ते किती यशस्वी होतात याची उत्सुकता आहे.

करंजकर यांच्यासोबत माजी नगरसेवक भागवत आरोटे, दीपक खुळे, विक्रम सोनवणे, रंगनाथ कचरे, मोहन बरे, संजय तुंगार, बबनराव कांगणे, संदीप गनोरे योगेश गांगुर्डे पंडितराव कातोरे, दत्तात्रय गुंजाळ, विनोद भागडे, दीपक मुसळे, विलास शिरसाट, संकेत कोरडे, बाळासाहेब गोवर्धने, भूषण जाधव आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी असल्याचा दावा करण्यात आला आहे.

करंजकर यांनी शिंदे गटात (Shivsena) प्रवेश केल्याने महायुतीचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांना देवळाली मतदारसंघात चांगली मदत होऊ शकेल. स्वतः गोडसे हे देखील देवळाली मतदारसंघातीलच आहेत.

त्यामुळे आता या मतदारसंघातून शिंदे गटाला मतांची किती आघाडी मिळते, याची उत्सुकता आहे. करंजकर यांना उमेदवारी मिळाली नाही. याबरोबरच पक्षाने आपल्याला योग्य प्रतिष्ठा दिली नाही, असा देखील आरोप केला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या नाशिकच्या ठाकरे (ShivsenaUBT) गटातील धुसफूस चर्चेत आली आहे.

Vijay Karanjkar
Dindori Constituency : शरद पवारांना 'गिफ्ट'; भाजपच्या पराभवासाठी जे.पी.गावितांची माघार!

शिवसेनेतील अंतर्गत राजकारणाचा परिपाक म्हणून करंजकर यांचे उदाहरण पाहता येईल. या घडामोडीत प्रारंभी कमकुवत वाटणाऱ्या शिंदे गटात आता अनेक नेत्यांचे इनकमिंग सुरू असल्याचे दिसते. त्याने शिवसेना ठाकरे गटाला किती नुकसान होते हे लोकसभेच्या निवडणुकीतून (Loksabha Election) पुढे येईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com