Eknath Shinde- Hemant Godse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Constituency News : मुख्यमंत्री शिंदेंनी नाशिक मतदारसंघासाठी लावली ताकद! आठवडाभरात तिसऱ्यांदा दौरा

Sampat Devgire

CM Eknath Shinde News: नाशिक मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे हेमंत गोडसे उमेदवार आहेत. हेमंत गोडसे यांचा प्रचार जोरदार सुरू आहे. आता त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ताकद लावली आहे.

शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांनी गेल्या आठवडाभरात विविध स्तरावर प्रचार केला आहे. रोड शो चौक सभा आणि प्रचार फेऱ्या यावर गोडसे यांचा विशेष भर आहे. शेवटच्या टप्प्यात मतदार संघातील अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज तसेच महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे यांनीही जोर लावला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या शिंदे गटाने प्रचाराचे जोरदार नियोजन केले आहे.

शिवसेना शिंदे गटाचे उत्तर महाराष्ट्र संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी सध्या नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत. भाऊसाहेब चौधरी यांनी आज पक्षाचा कार्यालयात सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. प्रचारातील कच्चे दुवे दूर करण्याचे काम केले. उद्यापासून शेवटच्या टप्प्यात होणाऱ्या प्रचारावर त्यांनी विशेष लक्ष केंद्रीत केले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गेल्या आठवड्याभरात तिसऱ्यांदा नाशिकचा दौरा करीत आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थिती उद्या सकाळी शहरातील सिटी सेंटर मॉल येथून सिडको भागात रोड शो करण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी बाराला विधान परिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत प्रचार मेळावा होणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

प्रचाराचे शेवटचे काही दिवस शिल्लक असल्याने शिवसेनेच्या शिंदे गटाने आपली सर्व ताकद प्रचारात झोकून दिली आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महायुतीसाठी सभा झाली. महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची सभा झाली. त्यामुळे वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांचा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे. यामुळे पक्षाची यंत्रणा आणि पदाधिकारी चांगलेच सक्रीय झाले आहेत.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT